23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeराष्ट्रीयनूपुर शर्मा टीव्हीवर येऊन माफी मागा

नूपुर शर्मा टीव्हीवर येऊन माफी मागा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : प्रेषितांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल नूपुर शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले. न्यायालयाने म्हटले की, देशभरात अशांतता पसरली आहे. देशात जे काही चालले आहे, त्याला नूपुर जबाबदार आहेत. त्यांनी आपल्या वक्तव्याने देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण केला आहे. कोर्टाने त्यांना टीव्हीवर येऊन देशाची माफी मागायला सांगितले.

वास्तविक, नूपुर शर्मा यांनी त्यांच्यावर विविध ठिकाणी दाखल झालेले खटले दिल्लीत वर्ग करण्यासाठी अर्ज घेऊन सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. शुक्रवारी सकाळी ११.०३ वाजता सुनावणी सुरू झाली, जी सकाळी ११.३० पर्यंत चालली. २७ मिनिटांच्या एकूण सुनावणीत न्यायालयाने उदयपूर हत्याकांडाचाही उल्लेख केला.

नूपुर शर्माने अपशब्दांसह बेजबाबदार गोष्टी बोलल्या, तेही परिणाम काय होईल याचा विचार न करता. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला यांच्या खंडपीठाने सांगितले की, नूपुर यांनी टेलिव्हिजनवर एका विशिष्ट धर्माविरुद्ध चिथावणीखोर टिप्पणी केली. त्यांनी अटींसह माफीही मागितली, तीही लोकांचा रोष उफाळून आला असताना. त्यातून त्यांचा अहंकार आणि उद्दामपणा दिसून येतो, असे न्यायालयाने म्हटले.

याचिकाही फेटाळली
नूपुर यांच्यावर दिल्ली, कोलकाता, बिहारपासून पुण्यापर्यंत अनेक गुन्हे दाखल आहेत. विविध राज्यांमध्ये नोंदवलेली सर्व प्रकरणे दिल्लीला हस्तांतरित करण्याची मागणी करणारी याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. यासंदर्भात माफी मागितल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले. परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता, असे कोर्टाने म्हटले आणि नूपूर यांच्याविरुद्ध दाखल खटले दिल्लीत हस्तांतरित करण्यास नकार दिला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या