23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeराष्ट्रीयनूपुर शर्मांच्या घातपाताचा कट उधळला

नूपुर शर्मांच्या घातपाताचा कट उधळला

एकमत ऑनलाईन

जैश-ए-मोहमदच्या अतिरेक्याला अटक
सहरानपूर : उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने शुक्रवारी मोठी कारवाई केली आहे. सहरानपूरमधून जैश-ए-मोहम्मद आणि तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान या संघटनांशी संबंधित असलेल्या कथित दहशतवाद्याला अटक केली आहे.

उत्तर प्रदेश पोलिस दलाचे अपर पोलिस महानिदेशक प्रशांत कुमार यांनी याबाबत माहिती दिली. सहरानपूरमधील गंगोह पोलिस ठाण्याच्या क्षेत्रातील कुंडा कला गावातील मोहम्मद नदीम याला एटीएसने अटक केली आहे. एटीएसने केलेल्या चौकशीत नदीमने नुपूर शर्मांच्या घातपाताची जबाबदारी स्वीकारली असल्याचे मान्य केले असल्याचे पोलिसांनी दिलेल्या माहितीमध्ये सांगण्यात आले आहे.

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या. उत्तर प्रदेश एटीएसने मोहम्मद नदीमकडून एक मोबाईल फोन, दोन सीमकार्ड आणि विविध प्रकारची स्फोटक बनवण्याचे प्रशिक्षण साहित्य जप्त केल्याची माहिती दिली आहे. प्रशांत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार नदीम जैश-ए-मोहम्मद आणि तहरिक-ए-तालिबानकडून प्रभावित होऊन आत्मघातकी हल्ला करण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद नदीमला अटक केल्यानंतर त्याच्याकडून जप्त केलेल्या मोबाईलच्या प्राथमिक पाहणीत त्याचे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील दहशतवाद्यांशी मेसेच आणि वॉईस मेसेजदेखील आढळले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या