नवी दिल्ली : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीचे आयोजन येत्या १६ आणि १७ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. या वेळी जे. पी. नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढविला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पुढील वर्षीच्या मध्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या निवडणुका नड्डा यांच्या नेतृत्वाखाली लढविण्याचे संकेत या आधीच पक्षाने दिले आहेत. जानेवारी अखेर त्यांचा कार्यकाळ संपणार आहे.