24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयदोषींच्या सुटकेवर यूएस आयोगाकडूनही आक्षेप

दोषींच्या सुटकेवर यूएस आयोगाकडूनही आक्षेप

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : गुजरातमधील बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील ११ दोषींच्या सुटकेनंतर देशात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असून आता या सर्व घडामोडींमध्ये अमेरिकेनीही उडी घेतली आहे. यूएस कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडमने ११ दोषींच्या मुदतपूर्व सुटकेच्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला आहे. जन्मठेपेची शिक्षा झालेल्या दोषींची लवकर सुटका करणे अन्यायकारक आणि न्यायाची थट्टा असल्याचे आयोगाने म्हटले आहे.

यूएससीआयआरएफचे उपाध्यक्ष अब्राहम कूपर यांनी दोषींना सोडण्याच्या निर्णयाचा निषेध करणारे निवेदन जारी केले आहे. आयोगाचे आयुक्त स्टीफन श्नेक म्हणाले की, हा निर्णय धार्मिक अल्पसंख्याकांवरील हिंसाचारात गुंतलेल्यांना मुक्त करण्याच्या पद्धतीचा एक भाग आहे. यूएस धार्मिक स्वातंत्र्य आयोगाने श्नेकचा हवाला देत म्हटले आहे की २००२ च्या गुजरात दंगलीतील दोषींना शिक्षा देण्यात यंत्रणा अपयशी ठरली आहे. भारतातील धार्मिक अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसाचार करणा-यांना शिक्षेपासून मुक्त करण्याचा हा एक मार्ग असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या