24 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeआंतरराष्ट्रीयकोव्हिशील्ड नव्हे भारतीय लसीकरण प्रमाणपत्राला आक्षेप

कोव्हिशील्ड नव्हे भारतीय लसीकरण प्रमाणपत्राला आक्षेप

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारताने लस मान्यतेबाबत घेतलेल्या कठोर भूमिकेनंतर इंग्लंडने आपल्या प्रवासी धोरणामध्ये बदल केले आहेत. सुधारित नियमांमध्ये कोव्हिशील्ड लसीला मान्यता देण्यात आली आहे. मात्र असे असले तरी ब्रिटनच्या आडमुठ्या धोरणामुळे भारतामध्ये कोव्हिशील्ड लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना देखील इंग्लंडमध्ये गेल्यानंतर क्वारंटाईन होणे अद्यापही सक्तीचे असणार आहे.

याबाबत इंग्लंड येथील संबंधित अधिका-यांनी अधिक माहिती देताना, आम्हाला भारतात दिल्या जाणा-या कोव्हिशील्ड लसीबाबत आपत्ती नसून भारतच्या लसीकरण प्रमाणपत्राबाबत शंका आहे, असे सांगितले. ऍस्ट्राजेनिका कोव्हिशिल्ड, ऍस्ट्राजेनिका व्हॅक्झिर्विया आणि मडोर्ना टेकीडा या लसींना मान्यता देण्यात आली, असे इंग्लंडच्या सुधारित प्रवासी धोरणामध्ये म्हटले आहे. ४ ऑक्टोबर पहाटे ४ पासून काही विशिष्ट देशांतील सार्वजनिक आरोग्य संस्थेच्या माध्यमातून ज्यांनी लस घेतली आहे त्यांचे लसीकरण पूर्ण झाले असल्याचे ग्रा धरण्यात येईल, असे देखील सुधारित धोरणांमध्ये म्हटले आहे. मात्र प्रवासी धोरणाद्वारे देण्यात आलेल्या देशांच्या यादीमध्ये भारताचे नाव नसल्याने कोव्हिशील्डचे दोन्ही डोस घेतलेल्या भारतीयांना देखील क्वारंटाईन राहावे लागणार आहे.

भारताशी चर्चा सुरू
ब्रिटिश हाय कमिशनने याबाबत सोमवारी जारी केलेल्या पत्रकामध्ये, भारताच्या कोरोना लसीकरण प्रमाणपत्राला मान्यता देण्यासंदर्भात भारताशी चर्चा सुरु असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, भारतामध्ये को-विन अ‍ॅपच्या माध्यमातून केंद्रीकृत (सेंट्रलाइझ्ड) पद्धतीने लसीकरण मोहीम सुरु आहे. याच माध्यमातून लसीकरण प्रमाणपत्र देखील वितरित करण्यात येते.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या