22.2 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीयआयुष्मान भारत योजनेचा लवकरच होणार विस्तार?

आयुष्मान भारत योजनेचा लवकरच होणार विस्तार?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा विस्तार करण्याचा विचार करत असल्याचे आरोग्य मंत्रालयाच्या अधिका-यांनी सांगितले. नवीन लाभार्थ्यांसाठी नाममात्र पैशांमध्ये उपचार देण्याची ही योजना आहे. पीएम मोदींनी २०१८ मध्ये ही योजना सुरू केली होती. याअंतर्गत १०.७४ कोटी कुटुंबांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळत आहेत.

एका वरिष्ठ सरकारी अधिका-याने ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत ज्यांना गरज आहे, अशा सर्वांना याचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे. नाममात्र पैशांमध्ये लोकांपर्यंत पोहोचवण्याची तयारी सुरू आहे. देशातील मध्यम उत्पन्न असलेल्या वर्गाकडे लक्ष देण्याची गरज आहे, जो गरीब किंवा श्रीमंत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांना आरोग्य विमा योजनेत समाविष्ट करण्याचा विचार केला जात आहे. ही योजना गरिब आणि सर्वसांमान्य लोकांना कवच देते. आधिका-यांनी सांगितल की, आरोग्य विमा मध्ये चालू घडीला साधारणपणे १२०० पासून १३०० रूपयेपर्यंत आहे. केंद्र सरकार आणि ६० : ४० च्या प्रमाणात खर्च उचलतात.

देशात असे लोक आहेत जे वर्षाला १,००,००० कमवतात. असे पण लोक आहेत, जे वर्षाला १०,००,००० रुपये कमवतात. जर तुम्ही निरीक्षण केले तर काही लोक अधिक कमवू शकतात, परंतु तो सर्व वैद्यकीय खर्च उचलू शकत नाही. त्यामुळे आम्हाला लाभार्थ्यांची यादी वाढवायची आहे. या योजनेचा गांभीर्याने विचार केला जात आहे, असे अधिका-याने सांगितले.

२८ हजार रुग्णालये या योजनेचा भाग
सध्या देशात सुमारे २८,००० रुग्णालये केंद्र सरकारच्या योजनेचा भाग आहेत. अधिका-याने सांगितले की, त्याच्या विस्तार योजनांचा एक भाग म्हणून सरकारने कॅशलेस उपचार देण्यासाठी अधिक खाजगी आणि सार्वजनिक रुग्णालये आधीच समाविष्ट करणे सुरू केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या