28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीयमणिपूरमधील जदयूचे ५ आमदार भाजपमध्ये

मणिपूरमधील जदयूचे ५ आमदार भाजपमध्ये

एकमत ऑनलाईन

मणिपूर : मागच्या काही दिवसांत बिहारमध्ये जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी भाजपसोबतची आपली युती तोडत राजदसोबत सत्ता स्थापन केली आहे. त्यानंतर जेडीयूचे अनेक आमदार भाजपच्या वाटेला गेले आहेत. जेडीयूला अरुणाचल प्रदेशमध्येही मोठा झटका बसला होता. त्यानंतर मणिपूरमधील ६ पैकी ५ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

मागच्या महिन्यात बिहारमध्ये भाजप आणि जेडीयू यांची युती तुटली आणि नितीश कुमारांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राजदसोबत आपले सरकार स्थापन केले. महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांनी आपल्या पक्षात फूट पडू नये, म्हणून हा निर्णय घेतला होता. त्यानंतर जेडीयूमधील काही आमदार नाराज झाले असून त्यांनी आपली भाजपवारी सुरू केली आहे. मणिपूरमध्ये ६० सदस्यीय विधानसभा असून तेथे भाजप हा सर्वांत मोठा पक्ष आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने ३२ जागा जिंकल्या आणि आपली एकहाती सत्ता स्थापन केली. त्यावेळी जेडीयूने ६ जागा जिंकत राज्यातील तिसरा सर्वांत मोठा पक्ष होण्याचा मान पटकावला होता.
२०२४ मध्ये जनताच धडा शिकवेल

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपवर हल्लाबोल केला. लोक कशा प्रकारे काम करत आहेत. इतर पक्षांतील लोकांना आपल्या बाजूने आणणे ही संविधानिक बाब आहे का, हे करणे योग्य आहे का, असे प्रश्न उपस्थित करत नितीश कुमार यांनी भाजपला इशारा दिला. सर्व विरोधी पक्ष एकत्र आल्यास २०२४ च्या निवडणुकीत देशातील जनतेचा निर्णय चांगलाच येईल. तेव्हा या लोकांना कळेल, असेही नितीश यांनी म्हटले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या