नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशभरातील नागरिकांना नव्या वर्षाचे गिफ्ट दिले आहे. एनएससी, पोस्ट ऑफिसमधील मुदत ठेवी आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजनांच्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पीपीएफच्या व्याजदरात कोणताही बदल करण्यात आला नाही. एक जानेवारी २०२३ पासून नवीन व्याजदर लागू होतील. आज अर्थमंत्रालयाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.
छोट्या बचत योजनांच्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. किसान विकास पत्र, पोस्ट ऑफिसच्या विविध बचत योजना, एनएससी आणि ज्येष्ठ नागरिकाच्या बचत योजना यामध्ये गुंतवणूक करणा-यांना खूशखबर मिळाली आहे. अर्थ मंत्रालयाने २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीसाठी जानेवारी ते मार्चपर्यंत वरील बचत योजनांच्या व्याजदरात वाढ केली आहे. पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी योजनांच्या व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.