24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeराष्ट्रीयशिवलिंगाबाबत आक्षेपार्ह पोस्ट; ओवैसींच्या प्रवक्त्याला अटक

शिवलिंगाबाबत आक्षेपार्ह पोस्ट; ओवैसींच्या प्रवक्त्याला अटक

एकमत ऑनलाईन

वाराणसी : गेल्या काही दिवसांपासून वाराणसीमधील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणावरून देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सोमवारी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. तर, दुसरीकडे सर्वेक्षण करणा-या अधिका-यांनी सर्वेक्षण पूर्ण झाले नसल्याचे सांगितले आहे.

वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांना शिवलिंगावर भाष्य करणे चांगलेच महागात पडले आहे. एआयएमआयएमचे प्रवक्ते आणि नेते दानिश कुरेशी यांना अहमदाबादच्या सायबर क्राइम ब्रँचने अटक केली आहे. दानिश कुरेशी यांनी शिवलिंगाबाबत आक्षेपार्ह पोस्ट लिहिली होती.

दानिश कुरेशी यांनी सोशल मीडियावर शिवलिंगाबाबत आक्षेपार्ह पोस्ट लिहिली होती. यानंतर विश्व हिंदू परिषदेने त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. वास्तविक, नुकतेच वाराणसी सत्र न्यायालयाच्या आदेशानंतर ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणाच्या शेवटच्या दिवशी हिंदू पक्षाने आवारात शिवल्ािंग सापडल्याचा दावा केला होता. यानंतर न्यायालयाने ही जागा सील करण्याचे आदेश दिले होते. मात्र, शिवलिंग मिळाल्याचा दावा मुस्लीम पक्ष सातत्याने फेटाळत आहे. ते शिवलिंग नसून कारंजे असल्याचे मुस्लिम बाजूचे म्हणणे आहे. जे जवळपास प्रत्येक मशिदीत बसवले जाते, असेही त्यांचे म्हणणे आहे.

तर, दुसरीकडे हिंदू पक्षाच्या या दाव्यानंतर सोशल मीडियावरही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या दाव्याच्या समर्थनार्थ अनेक लोक पोस्ट लिहित आहेत. त्यामुळे या दाव्यालाही अनेक जण विरोध करत आहेत. परंतु, यावेळी आक्षेपार्ह कमेंटही केल्या जात आहेत. अशीच कमेंट एआयएमआयएमचे प्रवक्ते दानिश कुरेशी यांनी केल्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या