34.4 C
Latur
Friday, March 5, 2021
Home राष्ट्रीय अधिकारी चक्रावले : तहसीलदाराच्या घरात सापडलेलं पैशाचं घबाड

अधिकारी चक्रावले : तहसीलदाराच्या घरात सापडलेलं पैशाचं घबाड

एकमत ऑनलाईन

जमिन खरेदी-विक्री व्यवहारात सहकार्य करण्यासाठी तहसिलदाराने ही 10 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती

हैदराबाद : शहरातील एका तहसीलदाराच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक पथका (एसीबी) ने छापा टाकून कारवाई केली. त्यामध्ये, सबंधित अधिका-याला 10 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. बलराजू असं आरोपी अधिका-याचे नाव असून पोलिसांनी लाच घेण्याच्या आरोपाखाली त्यास अटक केली आहे. या तहसीलदाराच्या घरात सापडलेलं पैशाचं घबाड पाहून अधिका-यांचेही डोळे फिरले.

जमिन खरेदी-विक्री व्यवहारात सहकार्य करण्यासाठी तहसिलदाराने ही 10 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. एसीबीच्या पथकाने तहसीलदार बलाराजू नागराजू यांच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी, लाच घेताना रंगेहात त्यांना पकडण्यात आले. तहसीलदारासोबतच एका ग्रामसेवकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. बी. साईराज असे या ग्रामसेवकाचे नाव असून 28 एकर जमिनीच्या व्यवहाराता ही लाच घेण्यात येत होती, अशी माहिती पुढे आली आहे.

हैदराबादपासून विलगीकरण केलेल्या मलकानगिरी या जिल्ह्यात एसीबीने ही कारवाई केली आहे. एसीबीच्या पथकाने लाचेची रक्कम मोजल्यानंतर तेही आश्चर्यचकित झाले आहेत. एसीबीकडून हैदराबादचे प्रमुख महसूल व निवासी परसरातील तहसीलदाच्या घरावर हा छापा टाकण्यात आला.

उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांच्या बहिणीने रेशन दुकानदाराच्या हाताचाच घेतला चावा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,440FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या