34.3 C
Latur
Tuesday, April 13, 2021
Homeराष्ट्रीयनक्षलवाद्यांच्या स्फोटात अधिकारी शहीद

नक्षलवाद्यांच्या स्फोटात अधिकारी शहीद

एकमत ऑनलाईन

रायपूर : छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या आयईडी च्या स्फोटामध्ये सीआरपीएफ च्या कोब्रा कमांडो युनिटचा एक अधिकारी शहीद झाला. तर ९ कमांडो जखमी झाले, सुरक्षा अधिका-यांनी ही माहिती दिली.

सुकमा जिल्ह्यातील चिंतालनार जंगलाच्या परिसरात शनिवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हा आयईडी चा स्फोट झाला. स्फोटात जखमी झालेल्या कमांडोंना मध्यरात्रीच्या सुमरास हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमधून घटनास्थळावरून बाहेर आणण्यात आले.

स्फोटामध्ये जखमी झालेले कोब्रा युनिटचे असिस्टंट कमांडंट नितीन भालेराव (वय ३३) यांचे आज सकाळी निधन झाले. पथकातील ९ कमांडो आणि या पथकाचे नेतृत्व करणारे सेकंड रँक ऑफिसरही या स्फोटात जखमी झाले.

हैदराबाद भाग्यनगर होणार नाही

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या