22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयझारखंड आमदारांच्या खरेदीसाठी केंद्राने वाढवल्या तेलाच्या किमती

झारखंड आमदारांच्या खरेदीसाठी केंद्राने वाढवल्या तेलाच्या किमती

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा मध्ये सोमवारी विषेश सत्रा मध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विश्वास दर्शक ठराव सादर केला. यावेळी बोलताना केजरीवाल यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टिका केली. ते म्हणाले दिल्ली सरकार पाडण्यासाठी भाजपने सुरू केलेल ‘ऑपरेशन लोटस’ फसले आहे. भाजपच्या एका देखील आमदाराला खरेदी करू शकले नाहीत. पण मी सांगतो की पुढच्या १५ दिवसाच्या आता झारखंड सरकार कोसळणार आहे.

केजरीवाल यांनी आरोप केला आहे की भाजप कडून १५ दिवसांच्या आत झारखंड मधील सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी पहिल्यांदा तेलाच्या किंमती वाढवल्या त्यातून मिळालेले पैसै झांरखंडच्या आमदारांना खरेदी करण्यासाठी वापरे जाणार आहेत. भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’ दिल्ली मध्ये यशस्वी झाले नाही. परंतु झारखंड मध्ये खुप प्रयत्न केले जात आहेत.

आमदारांना २०-२० कोटीची ऑफर
दिल्ली विधानसभेमध्ये विश्वास दर्शक ठराव सादर केल्या नंतर केजरीवाल यांनी भाजपला दम देत म्हणते जर तुमच्यात हिम्मत असेल तर आपच्या एका तरी आमदाराला खरेदी करून दाखवा. आमचे सगळे आमदार एकनिष्ठ आहेत. ते म्हणाले आप’च्या आमदारांना पक्ष सोडून भाजपमध्ये येण्यासाठी प्रत्येकी २० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती, पण आमचे आमदार प्रामाणिक आहेत त्यामुळे ‘ऑपरेशन लोटस’ अयशस्वी आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या