24.9 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeराष्ट्रीयसीमारेषेबाबत ओली नरमले

सीमारेषेबाबत ओली नरमले

एकमत ऑनलाईन

काठमांडू : भारताचे शेजारी राष्ट्र असलेल्या नेपाळनेही मे महिन्यात नेपाळचा चुकीचा नकाशा प्रसिद्ध करताना भारतातील कालापानी, लिपुलेख आणि लिम्पियाधुरा ही गावे स्वत:च्या देशाच्या हद्दीत दाखवली होती. याविषयी भारताने कडक शब्दांत समज देऊनही नेपाळ नमले नव्हते. मात्र आज विजयादशमीच्या मुहूर्तावर नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी दसऱ्याच्या शुभेच्छा देत सोशल मीडियावर स्वत:च्या फोटोसोबत नेपाळचा जुना नकाशा शेअर केला.

या नकाशात कालापानी, लिपुलेख व लिम्पियाधुराचा समावेश नाही. भारतीय गुप्तचर संघटना रिसर्च अँड ऍनालिसिस विंग अर्थात ‘रॉ’चे प्रमुख सामंतकुमार गोयल यांची भेट घेतल्यापासून ओली नरमले आहेत. गोयल यांनी याच आठवड्यात बुधवारी ओलींची भेट घेतली होती. तसेच भारताचे लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे हेही पुढील महिन्यात नेपाळचा दौरा करणार आहेत.

दरम्यान, आपल्या देशाचा जुना नकाशा शेअर केल्यामुळे पंतप्रधान ओलींवर नेपाळमधील विरोधी पक्षाकडून टीका होत आहे. पंतप्रधानांनी संसदेजवळ असलेल्या नकाशाचा वापर करायला हवा. ओलींचे हे पाऊल देशहिताचे नसल्याची टीका नेपाळमधील कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते गगन थापा यांनी केली.

वरुणने घेतली दिल्लीची फिरकी; तर हैदराबाद गारद

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या