25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeराष्ट्रीयअल्पमुदतीच्या कर्जावरील केंद्राची व्याज सूट कायम

अल्पमुदतीच्या कर्जावरील केंद्राची व्याज सूट कायम

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : मोदी सरकारने शेतक-यांसाठी मोठी घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने अल्प मुदतीच्या कर्जाच्या परतफेडीसाठी शेतक-यांसाठी व्याज सवलत योजना सुरू ठेवली आहे. म्हणजेच ३ लाखांपर्यंतचे अल्पमुदतीचे कर्ज घेतलेल्या शेतक-यांना व्याजात १.५ टक्के सूट मिळणार आहे.

मोदी सरकारने शेतक-यांना मोठा फायदा देत व्याज सवलत योजना कायम ठेवली. केंद्र सरकारला योजना लागू करण्यासाठी २०२२-२३ ते २०२४-२५ या कालावधीसाठी ३४,८५६ कोटींची अतिरिक्त अर्थसंकल्पीय तरतूद आवश्यक आहे. भरपाईसाठी सरकार ही देयके थेट कर्ज देणा-या बँका आणि सहकारी संस्थांना देते. शेतक-यांना शासनाकडून सहकारी व बँकांमार्फत अल्प व्याजदरात अल्प व दीर्घ मुदतीसाठी कर्ज दिले जाते. अनेक शेतकरी या कर्जाची वेळेवर परतफेड करतात, तर अनेक शेतकरी काही कारणास्तव वेळेवर परतफेड करू शकत नाहीत. जे शेतकरी कर्जाची वेळेवर परतफेड करतात, त्यांना व्याज सवलत योजनेचा लाभ मिळतो.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या