28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeराष्ट्रीयराज्यात आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर

राज्यात आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर

एकमत ऑनलाईन

लखनौ : उत्तर प्रदेशात आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजले असताना सर्व काही ठीक असल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा दावा आहे. मात्र, आता केंद्रीय मंत्र्यांनी पत्र पाठवून नाराजी व्यक्त केल्याने पोलखोल झाली आहे. केंद्रीय मंत्री आणि बरेलीतून लोकसभेवर निवडून गेलेले संतोष गंगवार यांनी उत्तर प्रदेश सरकारची पत्र लिहून कानउघाडणी केली आहे. आरोग्य विभागातील अधिकारी फोन उचलत नसल्याचा आरोप त्यांनी पत्रात केला आहे. ऑक्सिजन तुटवड्याचा प्रश्नही त्यांनी आपल्या पत्रात उचलला आहे.

रुग्णांना एका रुग्णालयातून दुस-या रुग्णालयात हेलपाटे मारायला लावले जात आहेत. शासकीय रुग्णालयात आल्यानंतर पुन्हा जिल्हा रुग्णालयात पाठवले जात आहे. यात रुग्णांची प्रकृती खालावत आहे. कोरोनाबाधित रुग्णाला कमीत कमी वेळेत रुग्णालयात दाखल केले पाहिजे, असे केंद्रीय मंत्री गंगवार यांनी पत्रात नमूद केले आहे. वैद्यकीय उपकरणे दीडपट किमतीने बाजारात विकली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. या वस्तूंच्या किमती सरकारने निश्चित कराव्यात. कोरोनाबाधित रुग्णांना बरेलीच्या खासगी रुग्णालयात दाखल केले पाहिजे. तसेच खासगी रुग्णालयानाही कोरोना रुग्णालयांसारखी सुविधा दिली पाहीजे, असेही त्यांनी सांगितले.

मध्य प्रदेशचे उदाहरण देत सरकारी आणि काही खासगी रुग्णालयांना ५० टक्क्यांपेक्षा कमी किमतीत ऑक्सिजन यंत्र द्यावे. तसेच लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी आयुष्मान भारत योजनेशी संलग्न असलेल्या रुग्णालयात लसीकरण सुरु करावे, अशा सूचनाही त्यांनी पत्रातून दिल्या आहेत. उत्तर प्रदेशात आतापर्यंत १४,८०,३१५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर १५ हजार १७० जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ३० एप्रिलपासून लागू करण्यात आलेला कर्फ्यू रविवारी १७ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे, अशी माहिती अतिरिक्त मुख्य सचिव नवनीत सहगल यांनी दिली.

राज्यात ६० हजार रुग्ण कोरोनामुक्त

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या