27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeराष्ट्रीयशिवसेनेच्या याचिकेवर तात्काळ सुनावणीस नकार

शिवसेनेच्या याचिकेवर तात्काळ सुनावणीस नकार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन झाले असले तरी राजकीय गोंधळ सुरूच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य १५ आमदारांना सभागृहातून निलंबित करण्याची मागणी करत उद्धव ठाकरे गटाच्या वतीने शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पण शिवसेनेच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे.

उपसभापतींनी निलंबित केलेल्या शिवसेनेच्या १६ बंडखोरांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी सुनील प्रभू यांनी केली होती. सोबतच या विषयावर निर्णय होईपर्यंत फ्लोअर टेस्ट थांबवण्याची मागणीही करण्यात आली होती. पण सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला असून १६ आमदारांच्या निलंबन नोटीस प्रकरणात ११ जुलैलाच सुनावणी होणार असल्याचे सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या