नवी दिल्ली : देशात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावरची पहिली स्वदेशी लस मिळणार आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविरुद्ध लस तयार करण्याची परवानगी दिली आहे.
या वर्षाच्या अखेरीस ही लस बाजारात येण्याची शक्यता आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविरुद्ध क्वाड्रीव्हॅलंट ूमन पॅपिलोमाव्हायरस लसीसाठी केंद्र सरकारकडे मंजुरी मागितली होती.
या लसीच्या फेज २ आणि ३ चाचण्या झाल्या आहेत. चाचणीमध्ये ही लस सर्व वयोगटातील महिलांवर प्रभावी ठरल्याचा दावा केला जात आहे. या लसीचा सर्व प्रकारच्या एचपीव्ही विषाणूवर परिणाम दिसून आला आहे.
२०२१ मध्ये लॅन्सेटचा अभ्यासही झाला होता. एचपीव्ही लसीमुळे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण ९० टक्के पर्यंत कमी होऊ शकते, असे सांगण्यात आले. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा भारतीय महिलांमधील दुसरा प्रमुख कर्करोग आहे. स्तनाचा कर्करोग पहिल्या क्रमांकावर आहे.