22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeराष्ट्रीयखासगी रुग्णालयांत एक कोटी डोस पडून; मोफत लसींचा परिणाम

खासगी रुग्णालयांत एक कोटी डोस पडून; मोफत लसींचा परिणाम

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशातील खासगी रुग्णालयात एक कोटी ८ लाख कोविशील्ड लसींचे डोस शिल्लक असल्याचे सांगितले असून, मागील दोन महिन्यात देशातील खासगी रुग्णालयाला दोन कोटी लसीचे डोस देण्यात आले होते. मात्र, यामधील एक कोटींपेक्षा जास्त लसी पडून असल्याचा खुलासा केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आला आहे़

देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरिही धोका कायम आहे. असे असतानाच देशात तिस-या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने लसीकरणावर भर दिला आहे. २१ जून २०२१ पासून देशभरात मोफत लसीकरणाला सुरुवात झाली आहे. कोरोना लसीकरणाला वेग देण्यासाठी खासगी रुग्णालयांनाही लस पुरवठा करण्यात आला आहे. पण खासगी रुग्णालयात मोफत लस नाही, त्यामुळे लोकांचा कल सरकारी रुग्णालयाकडे असल्याचे दिसत आहे़ खुल्या बाजारांतील नियमांनुसार, खासगी रुग्णांलयांना २५ टक्के लसी खरेदी करण्याचा आधिकार केंद्र सरकारने दिला आहे. त्यानुसार, एक मे ते २२ जून पर्यंत कोविशील्डच्या एक कोटी ९७ लाख डोस खासगी रुग्णालयाने खरेदी केले होते. उपलब्ध लस साठयानुसार २२ जून पर्यंत ८८ लाख ९ हजार डोसचा वापर करण्यात आला आहे. म्हणजेच देशात खासगी रुग्णालयात प्रति दिवस एक लाख ७१ हजार लसींचे डोस वापरण्यात आले आहेत.

कोव्हॅक्सीनच्या बाबतीत माहिती नाही
खासगी रुग्णालयाने उपलब्ध लस पुरवठ्याची माहिती केंद्र सरकारला दिली आहे. त्यानुसार, सर्वाधिक साठा महाराष्ट्रातील खासगी रुग्णालयात आहे. महाराष्ट्रातील खासगी रुग्णालयात २६.३३ लाख डोस अद्याप शिल्लक आहेत. कर्नाटक (१६.७४ लाख) आणि पश्चिम बंगाल (१६.६५ लाख) येथील खासगी रुग्णालयातही लसींचे डोस शिल्लक आहेत. कोव्हॅक्सीन लसीच्या साठ्यांबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र, याचे प्रमाण कमी असू शकते.

महाराष्ट्रात २६.३६ लाख डोसचा वापर
महाराष्ट्रातील खासगी रुग्णालयाने दोन महिन्यात ५२.६९ लाख डोस खरेदी केले आहेत. यापैकी २६.३६ लाख डोसचा वापर करण्यात आला आहे. कर्नाटकमधील खासगी रुग्णालयात ३१.६८ लाख पैकी १४.९३ लाख डोसचा वापर करण्यात आला आहे. तर पश्चिम बंगालने २६.९० लाख पैकी ३८ टक्के डोसचा म्हणजे १०.२४ लाख लसींचा वापर झाला आहे. दिल्लीमध्ये ३३ टक्के लसींचा वापर झाला आहे. दिल्लीतील खासगी रुग्णालयात ५.४० लाख लसीचे डोस वापरण्यात आले आहेत.

१० राज्यात ८९ टक्के लसींचा साठा शिल्लक
केंद्र सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार, दहा राज्यातील खासगी रुग्णालयात जवळपास ८९ टक्के लसींचा साठा शिल्लक आहे. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, तेलंगाणा, तामिळनाडू, पंजाब, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, हरियाणा आणि दिल्लीमधील खासगी रुग्णालयात ८९ टक्के लस साठा आहे.

बिहारमध्ये सर्वात कमी वापर
खासगी रुग्णालयातील एकूण साठ्यापैकी दहा टक्केंपेक्षा कमी लस वापरण्यात आलेल्या राज्यात मिजोरम, बिहार, मणिपूर आणि पुडुचेरी या राज्यांचा समावेश आहे. या राज्यातील खासगी रुग्णालयात २५ हजारांपेक्षा कमी लस खरेदी केल्या होत्या. दमन आणि दीवमधील खासगी रुग्णालयाने १५० लसी खरेदी केल्या होत्या. यामधील ५५ लसींचा वापर झाला आहे.

परंपरा आणि विज्ञान हीच भारताची ताकद

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या