नवी दिल्ली : मोमोज खाल्याने एका ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर एम्सच्या तज्ज्ञांनी मोमोज खाणा-यांना सतर्कतेचा इशारा दिला असून याबाबत सर्व राज्यांना मार्गदर्शन तत्त्वे जारी केली आहेत.
दक्षिण दिल्लीतील एका ५० वर्षीय व्यक्तीला मोमोजचे सेवन केल्यानंतर अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर या व्यक्तीला एम्स येथे दाखल करण्यात आले होते; मात्र येथे त्याला मृत घोषित करण्यात आले.