37.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeराष्ट्रीयकॉंग्रेसमध्ये एक परिवार, एक तिकीट फॉर्म्युला!

कॉंग्रेसमध्ये एक परिवार, एक तिकीट फॉर्म्युला!

एकमत ऑनलाईन

जयपूर : २२ राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसचे उदयपूरमध्ये चिंतन शिबिर सुरू झाले आहे. यात सातत्याने घराणेशाहीचा आरोप होणा-या काँग्रेसने आता एक परिवार एक तिकीट या फॉर्म्युल्याची घोषणा केली. काँग्रेसचा हा निर्णय पक्षांतर्गत विरोधकांना आणि घराणेशाहीची टीका करणा-या भाजपला प्रत्युत्तर असल्याचे सांगितले जात आहे. तिकीट हवे असेल, तर किमान ५ वर्षे संघटनेत काम करायला हवे. एका व्यक्तीला एका पदावर फक्त ५ वर्षेच राहता येईल. तसेच प्रत्येक कमिटीत आता ५० टक्के युवक असतील, असाही निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

एक परिवार एक तिकीट फार्म्युला आणताना काँग्रेससोबतच एक सोयीस्कर अपवादही आणत आहे. एखाद्या परिवारातला व्यक्ती जर राजकारणात सक्रिय होत असेल आणि त्याला तिकीट हवे असेल, तर त्याने किमान पाच वर्षे संघटनेत काम केलेले असले पाहिजे, अशी अट असणार आहे. तसेच एका व्यक्तीला एका पदावर केवळ पाच वर्षेच राहता येईल, अशीसुद्धा व्यवस्था काँग्रेस करणार आहे. याशिवाय संघटनेत दिल्लीपासून गल्लीपर्यंत प्रत्येक कमिटीत किमान ५० टक्के युवक असलेच पाहिजेत, हा आग्रह आहे. हे चिंतन शिबिर ३ दिवस चालणार आहे. यामध्ये राजकीय, सामाजिक न्याय आणि विकास, अर्थव्यवस्था, संघटन, शेतकरी आणि कृषी, तरुण आणि रोजगार या ६ विषयांवर चर्चा चर्चा करण्यात येणार आहे.

युवकांवर अधिक जबाबदारी
काँग्रेसमध्ये आता युवकांना अधिक प्राधान्य दिले जाणार असून ३५ ते ५० वयोगटातल्या युवकांवर अधिक जबाबदा-या देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये ५० वर्षांखालचे सर्व युवा मानले जाणार आहेत.

सामूहिक प्रयत्नांनीच पक्ष उभा राहू शकतो
यावेळी कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षासमोरचे संकट असाधारण आहे, याची मला जाण आहे. असाधारण संकटाचा सामना हा असाधारण पद्धतीनेच करावा लागतो. आपण बदल करणे आवश्यकच आहे. पण विशाल सामूहिक प्रयत्नांनीच पक्ष पुन्हा उभारी घेऊ शकतो, असे म्हटले.

भाजपकडून सुडाचे राजकारण
देशात भाजपकडून सूडाचे राजकारण केले जात आहे. तसेच अल्पसंख्याकांना लक्ष्य केले जात आहे. एकीकडे जी-२३ गटाने घेतलेल्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे चिंतन शिबिर होत आहे. त्यामध्ये हे महत्वाचे बदल करून पक्ष वेगवेगळ््या विचारांना खुला आहे हे संकेत दिले जाणार असल्याची माहिती आहे.

गांधी कुटुंबाला नियमातून सूट
गांधी घराण्यावर या तरतुदीच्या अंमलबजावणीबाबत माकन यांना विचारले असता त्यांनी हा प्रश्न गांधी घराण्याचा नाही. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक संघटना निवडणुकीच्या प्रक्रियेतून होणार आहे. पण एक कुटुंब, एक तिकीट ही तरतूद गांधी कुटुंबाला लागू होणार नाही, असेही अजय माकन यांनी सूचित केले.

सॉफ्ट हिंदुत्वाचा अवलंब
काँग्रेसच्या सार्वजनिक कार्यक्रमात प्रथमच माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांचे पोस्टर लावण्यात आले. दरम्यान, देशात पुन्हा कॉंग्रेसची ताकद वाढविण्यासाठी सॉफ्ट हिंदुत्वाचा अवलंब करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आल्याचे समजते.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या