बारामुल्ला : जम्मू कश्मिरातील बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. जम्मू काश्मिरच्या पोलिसांनी सांगितले की, परिसरात लष्कर आणि पोलिसांची शोधमोहीम सुरू आहे.
या कारवाईत दहशतवाद्यांकडून शस्त्रे जप्त करण्यात आली. सुरक्षा दलांना दोन दहशतवादी या परिसरात लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सेनेने सर्च ऑपरेशन सुरू केले आणि या परिसरात नाकेबंदी करण्यात आली होती.