28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeराष्ट्रीयओएनजीसी चे 'पापा-३०५' जहाज बुडाले

ओएनजीसी चे ‘पापा-३०५’ जहाज बुडाले

एकमत ऑनलाईन

मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेले तौत्के चक्रीवादळ सोमवारी मुंबईपासून गुजरातच्या दिशेने गेले. रौद्रवतार धारण केलेल्या या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी, मुंबईसह इतर शहरांना फटका बसला. चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडल्याने बॉम्बे हायजवळच्या परिसरात ओएनजीसीचे पी ३०५ (पापा-३०५) मोठे जहाज बुडाल्याची घटना घडली. रविवारी सायंकाळी जहाजावरून एसओपी संदेश मिळाल्यानंतर नौदलाने मदत व बचावकार्य हाती घेतले होते़ जहाजावर २६० लोक होते, त्यापैकी १४७ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले असून, इतरांचा शोध घेतला जात आहे. नौदल आणि ओएनजीसीच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली.

मुंबईजवळच्या अरबी समुद्रात बॉम्बे हाय असून, तेथे तेल उत्खनन होते. याच परिसरात हिरा ऑईल क्षेत्र असून, याठिकाणी ओएनजीसी चे जहाज पी ३०५ उभे होते. दरम्यान, कोकण किनारपट्टी ओलांडून तौते चक्रीवादळ मुंबईच्या दिशेने सरकले. त्यानंतर जहाज अपघातग्रस्त झाले. चक्रीवादळाबरोबरच प्रचंड मोठ्या लाटा येत असल्याने जहाजाचा नांगर दूर गेला आणि जहाज भरकटायला लागले. त्यानंतर जहाजावरून नौदलाला एसओपी (जहाज संकटात वा बुडत असल्यास जो संदेश पाठवला जातो, त्याला संक्षिप्त स्वरूपात एसओपी म्हटले जाते) संदेश पाठवण्यात आला. या जहाजांच्या मदतीला कोच्ची, कोलकाता या दोन मोठ्या युद्धनौका पाठवण्यात आल्या होत्या, असे ओएनजीसीच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

पी ८१ कडून शोधकार्य सुरूच
नौदलाचे पी ८१ हे विमान समुद्रात इतरांचा शोध घेत आहे. या शोध मोहिमेत किनारलगत तैनात असणा-या एनर्जी स्टार आणि अहल्या या दोन नौकाही उतरवण्यात आल्या असल्याचे नौदलाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

२ कोटी लसीकरण करणारा महाराष्ट्र देशात अव्वल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या