25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयकाँग्रेसचे आमदारच भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक होते

काँग्रेसचे आमदारच भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक होते

एकमत ऑनलाईन

पणजी : गोव्यात बुधवारी काँग्रेसच्या आठ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ऐन भारत जोडो यात्रा सुरू असताना काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. यावर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, काँग्रेसचे आठ आमदार भाजपमध्ये येण्यास तयार होते. नरेंद्र मोदीजी देशात चांगले काम करत आहेत. गोव्यातही चांगले काम होत असून डबल इंजिन सरकार आहे. त्यामुळे आम्ही काँग्रेसच्या आमदारांचे स्वागतच केले आहे.

राहुल गांधी भारत जोडो यात्रा करत असताना हे मिशन पार पडले आहे. यासंदर्भात सावंत म्हणाले की काँग्रेस छोडो यात्रा गोव्यातून सुरू झाली आहे, राहुल गांधी भारत जोडो यात्रा करत आहे. मात्र गोव्यात काँग्रेस छोडो यात्रा सुरू झाली आहे. काँग्रेसचे उर्वरित नेतेही पक्ष सोडणार असून देशहितासाठी ते भाजप किंवा इतर कोणत्याही पक्षात सामील होतील असेही सावंत यांनी म्हटले.

काँग्रेसचे तीन आमदार कसकाय सुटले, त्यांच्याशी संपर्क झाला नाही का? या प्रश्नावर सावंत म्हणाले, काँग्रेसचे आमदार कोणत्याही पूर्व अटीशिवाय भाजपमध्ये दाखल झाले आहेत. आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला नव्हता. त्यांना भाजपमध्ये प्रवेश घ्यायचा होता. काँग्रेसमध्ये आता कोणतेही नेतृत्व उरले नाही. मी दिल्लीला जाणार असून प्रवेश केलेल्या आमदारांमुळे सध्या मंत्रिमंडळात फेरबदलाची कोणतीही योजना नसल्याचेही सावंत यांनी स्पष्ट केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या