37.8 C
Latur
Monday, May 29, 2023
Homeराष्ट्रीयखासगी, शासकीय रूग्णालयात केवळ दिल्लीवासीयांवरच उपचार

खासगी, शासकीय रूग्णालयात केवळ दिल्लीवासीयांवरच उपचार

- मुख्यमंत्री केजरीवाल यांची माहिती

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: दिल्ली शहरातील म्हणजेच एनसीआर खासगी तसेच सरकारी रुग्णालयांमध्ये कोरोना साथीच्या काळात स्थानिक रुग्णांवरच उपचार करण्यात येतील, अशी माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.
कोरोनासंदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या महत्वाच्या निर्णयांची माहिती केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी त्यांनी दिल्लीमधील रुग्णालयांमध्ये इतर जवळच्या भागांमधून येणाºया रुग्णांवर उपचार केले जाणार नसल्याचे सांगत स्थानिक रुग्णांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे स्पष्ट केले. काही विशेष शस्त्रक्रीयांसाठी दिल्लीबाहेरून आलेल्या रुग्णांवर केवळ खासगी रुग्णालयांमध्येच उपचार केले जाणार असल्याचेही केजरीवाल यांनी सांगितले.

सीमांवरील निर्बंध उठवणार
दिल्लीमधील ९० टक्क्यांहून अधिक नागरिकांनी कोरोना साथीच्या काळामध्ये दिल्लीतील लोकांवरच येथील रुग्णालयांमध्ये उपचार केले जावेत, अशी मागणी केली आहे. त्यामुळेच या पुढे दिल्लीतील खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये स्थानिक रुग्णांवरच उपचार केले जाणार आहेत. इतर शहरांमधून दिल्लीमध्ये शस्त्रक्रीया करण्यासाठी रुग्ण दाखल झाल्यास त्यांना खासगी रुग्णालयामध्येच उपचार घ्यावे लागतील, अशी माहिती केजरीवाल यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली.दिल्ली सरकार सोमवारपासून (आठ जूनपासून) उत्तर प्रदेश आणि हरियाणा राज्याला लागून असणाºया सीमांवरील निर्बंध उठवणार असल्याचेही केजरीवाल यांनी म्हटले आहे. सोमवारपासून या सीमांवरुन सामान्यपणे वाहतूक सुरु होणार असल्याचे संकेत केजरीवाल यांनी दिले आहेत.

Read More  धक्कादायक : वडिलांनी बाईक दिली नाही म्हणूम तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या

वाढत्या कोरोना रूग्णांमुळे सरकारवर ताण
दिल्लीमधील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून, त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील आरोग्य यंत्रणांवर ताण पडत आहे. हाच भार हलका करण्यासाठी केजरीवाल सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्लीमध्ये रविवार दुपारपर्यंत (७ जून रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत) २६ हजार ३३४ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ७०८ इतकी आहे.

त्याचबरोबर केंद्र सरकारने दिलेल्या सूचना आणि निर्देशांनुसार दिल्लीमधील अनेक सेवा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती केजरीवाल यांनी दिली आहे. दिल्लीमधील मॉल, रेस्तराँ, धार्मिक स्थळे केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांनुसार सुरु करण्यात येणार आहेत, असे केजरीवाल यांनी सांगितले आहे. एकीकडे रेस्तराँ सुरु करण्यात येणार असले तरी मोठी हॉटेल आणि बॅक्वेट हॉल्स बंदच ठेवली जाणार असून, यामागील कारणही केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे.हॉटेल्स आणि बँक्वेट बंदच राहणार असून भविष्यात या जागी रुग्णालयांसारख्या सुविधा निर्माण करण्यासाठी वापरल्या जाऊ शकतात, असे केजरीवाल म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या