24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeराष्ट्रीयमहिलांना लष्करातील वरिष्ठ पदावर पदोन्नती मिळण्याचा मार्ग खुला; सिलेक्‍शन कमिशन नेमण्यात आले

महिलांना लष्करातील वरिष्ठ पदावर पदोन्नती मिळण्याचा मार्ग खुला; सिलेक्‍शन कमिशन नेमण्यात आले

एकमत ऑनलाईन

पुणे – सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महिलांना लष्करातील वरिष्ठ पदावर पदोन्नती मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. आता यासाठी लष्करातर्फे निवड आयोग म्हणजेच सिलेक्‍शन कमिशन नेमण्यात आले असून, दिल्ली येथील लष्कराच्या मुख्यालयात या आयोगाचे कामकाज सुरू करण्यात आले आहे.

लष्करी सेवेत महिलांना परमनंट कमिशन म्हणजेच कायमस्वरूपी पदावर नियुक्ती मिळावी, असा निर्णय नुकताच सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. यामुळे महिलांना कर्नल रॅंकपेक्षा वरिष्ठ रॅंकवर नियुक्ती मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. तसेच यामुळे लष्करी प्रशिक्षण, संशोधन आणि कार्यालयीन आस्थापनांच्या प्रमुखपदी नियुक्ती मिळणार आहे.

मात्र, यासाठी महिला व पुरूष दोन्ही अधिकाऱ्यांची निवड ही सिलेक्‍शन कमिशनच्या माध्यमातून केली जाते. त्यानुसार महिला अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी लष्कर प्रशासनातर्फे या आयोगाची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसेच ब्रिगेडियर रॅंकच्या महिला अधिकारी या आयोगात निरीक्षक म्हणून काम पाहतील. यामुळे निवड प्रक्रियेत पारदर्शकता राहील, असा विश्‍वास व्यक्त करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या