23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeराष्ट्रीयगोव्यात ऑपरेशन लोटस यशस्वी

गोव्यात ऑपरेशन लोटस यशस्वी

एकमत ऑनलाईन

पणजी : गोव्याच्या राजकारणात राजकीय घडामोड मोठा वेग आला आहे. एकीकडे काँग्रेसचे नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रा करत असतानाच काँग्रेससाठी हा मोठा धक्का असणार आहे. काँग्रेसचे ८ आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. यामध्ये दिगंबर कामत यांचाही समावेश आहे. गोव्याच्या राजकारणात ही मोठी घटना आहे. या घटनेमुळे गोव्यात ऑपरेशन लोटस यशस्वी झाल्याच्या चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत.

दोन महिन्यांपूर्वीच गोव्यामध्ये ऑपरेशन लोटस राबवण्यात भाजपाला अपयश आले होते. मात्र यावेळी भाजपाची राजकीय खेळी प्रभावी ठरताना दिसत आहे. काँग्रेसचे आठ आमदार आज भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. गोव्यातील काँग्रेसच्या ११ पैकी ८ आमदारांचा भाजप प्रवेश होणार आहे. काँग्रेसचे दोन तृतीयांश आमदार भाजपात जात आहेत.

भाजपमध्ये जाणारे आमदार कोण-कोण आमदार?
१) मायकल लोबो (माजी विरोधी पक्षनेते)
२) दिगंबर कामत,
३) दिलायला लोबो,
४) राजेश फळदेसाई,
५) रुदाल्फ फर्नांडिस,
६) लेक्स सिक्वेरा,
७) केदार नाईक,
८) संकल्प आमोणकर

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या