17.4 C
Latur
Wednesday, January 26, 2022
Homeराष्ट्रीयविरोधक राज्यात दंगल घडवण्याची स्वप्न बघतायत - योगींचा हल्लाबोल

विरोधक राज्यात दंगल घडवण्याची स्वप्न बघतायत – योगींचा हल्लाबोल

एकमत ऑनलाईन

लखनौ – विरोधक आंतरराष्‍ट्रीय फंडिंगच्या माध्यमाने जात आणि संप्रदायावर आधारीत दंगलींचा पाया घालून आमच्या विरोधात कट-कारस्थान आखत आहेत. गेल्या आठवडाभरापासून विरोधकांना राज्यात दंगली बघायच्या आहेत. मात्र, सर्व कटांवर मात करून आपल्याला पुढे जायचे आहे, असे योगींनी म्हटले आहे.

तत्पूर्वी, संरक्षण संस्थांनी विरोधाआडून राज्यात जातीय दंगे घडवण्याचा आणि मुख्यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांची प्रतिमा मलीन करण्याचा मोठा कट रचला जात आसल्याचा खुलासा केल्याचे, सरकारकडून सांगण्यात आले होते. सरकारच्या म्हणण्या प्रमाणे, एका वेबसाईला इस्‍लामिक देशांकडून फंडिंग होत होते. एम्‍नेस्‍टी इंटरनॅशनल संस्‍थेशीही याचे संबंध असल्यासंदर्भात चौकशी सुरू आहे.

जनतेला चिथावण्यासाठी साईटचा वापर
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संरक्षण संस्थांनी http://justiceforhathrasvictim.carrd.co/ नावाच्या एका वेबसाईटला जाळ्यात घेतले आहे. या वेबसाईटवर पोलिसांच्या तावडीतून सुटण्याच्या आणि विरोध करण्यासंदर्भात माहिती दिली होती. एवढेच नाही, तर या वेबसाईटच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांनी निदर्शनात सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले होते. या शिवाय, दंगल सुरू झाल्यानंतर आश्रू गॅसचे गोळे आणि अटकेपासून स्वत:चा बचाव कसा करावा, हेही या वेबसाईटवर सांगण्यात आले होते.

इस्‍लामिक देशांकडून मिळायचे फंडिंग
या वेबसाईटला इस्‍लामिक देशांकडून मोठ्या प्रमाणावर मदत मिळत होती. एम्‍नेस्‍टी इंटरनॅशनल संस्‍थेशीही या वेबसाईटचे संबंध असल्यासंदर्भात चौकशी सुरू आहे. एवढेच नाही, तर सीएए विरोधात सहभागी असलेल्या पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) आणि सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचा (एसडीपीआय)देखील ही वेबसाईट तयार करण्यात आणि ती चालवण्यात हात असल्याचा संशय आहे.

पुलवामा मध्ये पंपोर बायपासजवळ दहशतवादी हल्ला; 2 सीआरपीएफ जवान शहीद

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या