29.8 C
Latur
Saturday, December 3, 2022
Homeराष्ट्रीयहरियाणात विरोधक एकवटले

हरियाणात विरोधक एकवटले

एकमत ऑनलाईन

चंदीगढ : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्ष नेत्यांनी आतापासूनच तयारी सुरु केली आहे. माजी उपपंतप्रधान चौधरी देवीलाल यांच्या १०९ व्या जयंतीनिमित्त हरियाणातील फतेहाबाद येथे आज अनेक विरोधी पक्षनेते एकवटले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी शेतक-यांच्या मुद्यावर केंद्र सरकारला लक्ष्य करत सरकारने शेतकरी नेत्यांवरील खटले मागे घेण्याचे आश्वासन दिले, परंतु ते पूर्ण केले नाही, असा आरोप केला. २०२४ मध्ये सरकार बदलण्यासाठी सर्वांनी एकत्र मिळून काम करण्याची वेळ आली आहे. आमचे शेतकरी, तरुण आत्महत्या करत आहेत. मात्र, सरकारने यावर तोडगा काढला नसल्याचा आरोप केला.

यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, शिरोमणी अकाली दलाचे सुखबीरसिंग बादल, माकप नेते सीताराम येचुरी आणि जेडीयूचे महासचिव के. सी. त्यागी उपस्थित होते. यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी ओमप्रकाश चौटाला यांना फसवून तुरुंगात पाठवण्यात आले. त्यांनीच आम्हाला भाजप सोडण्यास सांगितले. आम्ही त्यांचे म्हणणे ऐकले. गेल्या निवडणुकीत आमच्या उमेदवाराचा पराभव करण्यात त्यांचा सहभाग होता. मला मुख्यमंत्री व्हायचे नव्हते, ते (भाजप) आश्वासन दिल्याप्रमाणे काम करत नव्हते. बिहारमध्ये ७ पक्ष एकत्र आले आहेत. २०२४ मध्ये ते (भाजपला) जिंकू देऊ शकत नाहीत. संपूर्ण देशाला संघटित केले पाहिजे. चौटाला तुम्ही लोकांना जोडायला सुरुवात करा. सर्व प्रकारची लोक जोडा आणि याबाबत आम्ही काँग्रेसलाही विनंती केली आहे. असे झाल्यास २०२४ मध्ये त्यांचा पराभव होईल, असे सांगितले.
भाजपला धडा शिकवला पाहिजे
यादरम्यान तेजस्वी यादव यांनीही आपल्या भाषणात भाजपवर जोरदार निशाणा साधला. तेजस्वी यादव म्हणाले की, आजचा दिवस सन्मान दिन म्हणून साजरा केला जात आहे. चौधरी देवीलाल यांनी शेतक-यांना एकत्र केले. आज केंद्रात बसलेल्या लोकांना या देशात फक्त भाजप आणि संघ हवा आहे. त्यामुळे या सरकारला धडा शिकवला पाहिजे, असे म्हटले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या