21.1 C
Latur
Tuesday, March 9, 2021
Home राष्ट्रीय RBI मध्ये थेट मुलाखतीनं नोकरी मिळण्याची संधी

RBI मध्ये थेट मुलाखतीनं नोकरी मिळण्याची संधी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्लीः भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय भरती २०२०) मध्ये नोकरी शोधणार्‍या तरुणांसाठी अर्ज करण्याची उत्तम संधी आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामधील डेटा अ‍ॅनालिस्ट, कन्सल्टंट, अकाउंट स्पेशलिस्ट या 39 पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. आज म्हणजे 22 ऑगस्ट 2020 या पोस्ट्ससाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. जर आपणही बँकेत नोकरी करण्यास इच्छुक असाल तर रिझर्व्ह बँकेत रिक्त जागेवरील महत्त्वाचे डिटेल्स जाणून घ्या.

आरबीआय भरती 2020: पदांची संख्या

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये या रिक्त जागांनुसार डेटा अ‍ॅनालिस्ट, सल्लागार, खाते विशेषज्ञ यासह एकूण 39 पदे नियुक्त केली जातील.

शैक्षणिक पात्रता

आरबीआय भरतीसाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पदांनुसार वेगळी ठरविण्यात आली आहे. यामध्ये अकाउंट स्पेशलिस्ट पदासाठी अर्ज करण्यार्‍या उमेदवाराकडे सीएची (CA) पदवी असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामधील 39 पदांसाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ज्यामध्ये किमान वय 25 वर्षे आणि कमाल वय 40 वर्षे निश्चित केले गेले आहे.

निवड प्रक्रिया

आरबीआयमधील या पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखत आणि शॉर्टलिस्ट (स्क्रीनिंग) च्या आधारे केली जाईल. अधिक माहितीसाठी आपण अधिकृत सूचनासाठी येथे क्लिक https://opportunities.rbi.org.in/Scripts/bs_viewcontent.aspx?Id=3846 करुन पाहू शकता.

अर्ज कसा करावा

इच्छुक आणि पात्र उमेदवार आरबीआयच्या अधिकृत वेबसाइट rbi.org.in वर 22 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी वर दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

सुशांतच्या भाचीची पोस्ट ….म्हणालीमामा, मी तुझ्यावर ब्रह्मांडापेक्षाही भरपूर प्रेम करते

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,444FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या