24 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयचहा पिऊन विरोधक एकत्र येत नसतात

चहा पिऊन विरोधक एकत्र येत नसतात

एकमत ऑनलाईन

पाटणा : बिहार राजकारणात सक्रीय झाल्यानंतर रणनितीकार प्रशांत किशोर यांनी पुन्हा एकदा मिडीया समोर जावून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांच्या दिल्ली दौ-यावर प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले नेत्यांच्या भेटी आणि सोबत चहा पिऊन राजकारण बदलत नाही.

प्रशांत किशोर यांनी बिहार मधील बदललेल्या राजकारणावर म्हणाले, नितीश यांनी भाजप सोडून महागठबंधनमध्ये गेल्याची घटना राज्यावर अवलंबून आहे. याचा राज्याच्या राजकारणावर काहीही फरक पडणार नाही. ते म्हणाले महाराष्ट्रात पहिल्यांदा महाविकास आघाडीचे सरकार होते. आणि आत्ता एनडीएचे सरकार आहे. परंतु याचा प्रभाव बिहारवर नाही झाला. ते म्हणाले नितीश यांच्या दौरांचा काहीही फरक राजकारणावर पडणार नाही, आणि त्या दौ-यांना काडी मात्र महत्त्व नाही. प्रशांत किशोर म्हणाले नितीश कुमारांनी राज्यात काहीच विकास केला नाही. बिहीर आजही मागास राज्य आहे. नितीश सुरक्षे शिवाय बाहेर पडले तर त्यांना समजेल विकास. नितीश कुमार १० वर्षांपासून राजकीय निती दाखवून खुर्चीला चिकटून बसले आहेत. खुर्चीला चिकटून काहीही होणार नाही. तुम्हाला जमिनीवर उतरून काम करावे लागेल असे प्रशांत किशोर म्हणाले.

प्रशांत किशोर यांची राहुल गांधी यांच्यावर टिका
ते म्हणाले राहुल गांधी यांनी त्या राज्यात यात्रा केली पाहिजे जिथे, काँग्रेसला विरोधी पक्ष भाजप असेल. आता नितीश कुमार यांना जनतेच्या पाठिंब्यावर बिहारमध्ये विजय मिळवणे अवघड आहे. नितीश कुमारांविरोधात लोकांमध्ये रोष आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या