26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeराष्ट्रीयकेरळात पुन्हा ऑरेंज अ‍ॅलर्ट

केरळात पुन्हा ऑरेंज अ‍ॅलर्ट

एकमत ऑनलाईन

कोच्ची : परतीच्या पावसाला काही दिवस राहिले असतानाच पुन्हा एकदा केरळात दक्षिण-पश्चिम मान्सून सक्रिय झाला आहे. गुरूवार दि. २१ ऑक्टोबर रोजी) दिवसभरात वादळी वा-यासह मुसळधार पाऊस झाला. हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. शिवाय आठ जिल्ह्यांत ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी केला आहे. राज्यात आणि लक्षद्वीपला संततधार सुरू असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागने दिली आहे. मच्छीमारांना केरळ राज्यात समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. सध्या केरळ राज्यात पावसाने थैमान घातले आहे, तर हिमाचल प्रदेशात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे.

केरळमध्ये पटनमथिट्टा, कोट्टायम, इडुक्की, पलक्कड़, मलप्पुरम, कोझीकोड, वायनाड आणि कन्नूर या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याशिवाय तिरुवनंतपुरम, कोल्लम, अलाप्पुझा, एर्नाकुलम, त्रिशूर आणि कासरगोड या जिल्ह्यांत येलो अलर्ट जारी केला आहे.

केरळात दक्षिण-पश्चिम मान्सून सक्रिय
राज्यात जोरदार पाऊस झाला असून, पलक्कड़ जिल्ह्यांतील परम्बिकुलममध्ये बारा सेंटीमीटर तर एर्नाकुलममध्ये एनामक्कल (त्रिशूर) आणि मन्नारक्कड़ (पलक्कड़) मध्ये ११ सेमी एवढा पाऊस झाला आहे, असे हवामान खात्याने सांगितले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या