नवी दिल्ली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी छठ पूजेच्या वेळी केलेल्या भावना भडकवणा-या भाषणाबद्दल समन्स देण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने रद्द केले आहे. या प्रकरणी झालेल्या सुनावणीमध्ये धर्म व श्रद्धा माणसाइतकी नाजूक नसते, असंही न्यायालयाने म्हटले आहे.
न्यायमूर्ती जसमीत सिंग यांनी बोकारो (झारखंड), बेगुसराय (बिहार), पाटणा आणि रांची येथील विविध न्यायालयांनी दिलेले आदेश रद्द केले आहेत. हा आदेश देताना न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, भारत हा एक देश आहे जो विविध धर्म, श्रद्धा आणि भाषांमुळे अद्वितीय आहे. माझे मत आहे की भारत हा एक देश आहे जो विविध धर्म, जाती, भाषा असूनही एकत्र आहे.
यासह अस्तित्वात एकता आहे. धार्मिक भावना एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याने दुखावल्या जातील किंवा भडकवल्या जाव्यात एवढया नाजूक असू शकत नाहीत. धर्म आणि श्रद्धा या माणसांइतकी नाजूक नसतात असे न्यायालयाने म्हटले आहे. धर्म व श्रद्धा शतकानुशतके टिकून राहिली आहेत आणि आणखी कितीतरी काळ टिकून राहतील. श्रद्धा आणि धर्म अधिक लवचिक आहेत आणि एखाद्या व्यक्तीच्या/भडकावण्याच्या मतांमुळे दुखावले जाऊ शकत नाही किंवा चिथावणी दिली जाऊ शकत नाही असे आदेशात म्हटले आहे.