24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeराष्ट्रीयअदर पुनावाला यांना एशियन ऑफ द इअर

अदर पुनावाला यांना एशियन ऑफ द इअर

एकमत ऑनलाईन

सिंगापूर : पुण्यातील प्रख्यात सीरम इन्स्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांना यंदाचा एशियन ऑफ द इअर हा पुरस्कार जाहीर झाला आहे. सिंगापुरच्या द स्ट्रेट टाईम्स तर्फे या पुरस्कारासाठी सहा जणांची यादी जाहीर झाली आहे त्यात हे नाव आहे.

सीरम इन्स्टिट्यूटने ऑक्­सफर्ड युनिर्व्हीसीटी आणि अ‍ॅस्ट्राझेनका कंपनीच्या संयुक्त विद्यमाने कोरोनावरील कोविशिल्ड नावाची लस विकसित केली असून, त्याच्या चाचण्या सध्या सुरू आहेत. अन्य पुरस्कार विजेत्यांमध्येही कोरोनाच्या औषधांच्या संबंधात योगदान देणा-या व्यक्तींचाच भरणा आहे.

या क्षेत्रातील सहाही पुरस्कार विजेत्यांचा उल्लेख द व्हायरस बस्टर्स असा करण्यात आला आहे. कोरोनाच्या साथीमुळे आज सारे जग अडचणीत आहेत. लक्षावधी लोकांना याची लागण झाली असून, त्यातील मृतांचे प्रमाणही मोठे आहे. त्यामुळे या रोगावर इलाज शोधणे ही मानवतेची सर्वात मोठी गरज आहे. आणि त्यासाठी कष्ट घेणा-यांचा हा सन्मान आहे.

भारतीय नौदलात लवकरच ‘रोमिओ’ची एन्ट्री

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या