26.9 C
Latur
Sunday, January 24, 2021
Home राष्ट्रीय गॅस सिलेंडरसाठी आता ओटीपी अनिवार्य!

गॅस सिलेंडरसाठी आता ओटीपी अनिवार्य!

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : घरगुती गॅस सिलिंडर डिलिव्हरीच्या नियमावलीत आता मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. अर्थात, गॅस सिलिंडरचा लाभ पात्र ग्राहकांना व्हावा, यासाठी डिलिव्हरीदरम्यान ओटीपी नंबर अनिवार्य करण्यात आला आहे. १ नोव्हेंबरपासून देशातील १०० स्मार्ट सिटीत याची अंमलबजावणी होणार आहे. त्यानंतर देशात ही योजना लागू होणार आहे. ही योजना फक्त घरगुती गॅसपुरती मर्यादित असणार आहे, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.

या नव्या व्यवस्थेनुसार गॅस सिलिंडर ग्राहकांनी गॅसची बुकिंग केल्यानंतर त्यांना ओटीपी प्राप्त होईल. त्यानंतर जेव्हा डिलिव्हरी बॉय गॅस सिलिंडर पोहोचविण्यासाठी येईल, त्यावेळी त्याला ओटीपी नंबर दाखवावा लागेल. ही योजना लागू झाल्यानंतर ओटीपी दाखविल्याशिवाय गॅस सिलिंडर मिळू शकणार नाही. राजस्थानची राजधानी जयपूर आणि तामिळनाडूमधील कोईम्बतूर या शहरांत प्रायोगिक तत्त्वावर ही योजना लागू करण्यात आली होती. ही योजना यशस्वी ठरल्यानंतर १ नोव्हेंबर २०२० पासून या योजनेचा विस्तार १०० स्मार्ट शहरांत करण्यात येणार आहे. या शहरांतील अनुभव घेऊन ही योजना देशभर लागू करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

सरकारी तेल कंपन्यांनी नव्या सिस्टीमला लागू करण्याची संपूर्ण तयारी केली आहे. नवी सिस्टीमला डिलीव्हरी ऑथेंटिकेशन कोड (डीएसी) हे नाव देण्यात आले आहे. ही नवी योजना लागू करण्यामागचा हेतू गॅस सिलिंडरची चोरी रोखणे हा आहे. कारण सद्यस्थितीत गॅस बुकिंग केल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांना त्याची डिलेव्हरी होईलच असे नाही. यातून होणारी गैरसोय टाळतानाच योग्य व्यक्तीला गॅस सिलिंडरचा लाभ व्हावा, यासाठी तेल कंपन्यांनी यासाठी पुढाकार घेतला असून, प्रायोगिक तत्त्वांवर दोन शहरात ही योजना लागू करून त्याचा अनुभव घेतला. त्यानुसार हळूहळू याचा विस्तार करण्यात येत असून, दोन शहरांपुरती मर्यादित योजना आता १०० स्मार्ट सिटीना लागू होणार आहे.

ओटीपीवर आधारीत डिलिव्हरी
घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर पुरविण्यासंदर्भात नवी नियमावली जारी करण्यात आली असून, ती आपल्या नोंदणीकृत मोबाईलवर ओटीपी क्रमांकावर आधारीत असणार आहे. ओटीपी नसेल, तर डिलिव्हरी मिळणार नाही., असे त्यात नमूद करण्यात आले आहे.

होम डिलिव्हरीची नवी सिस्टीम
तेल कंपन्या नव्या सिस्टीमला डिलीव्हरी ऑथेंटिकेशन कोडशी जोडणार आहेत. ज्यामुळे बुकिंग केल्यानंतर रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक कोड पाठवला जाईल. या सिस्टीमअंतर्गत जोपर्यंत तुम्ही डिलीव्हरी बॉयला हा ओटीपी दाखवत नाही. तोपर्यंत सिलेंडरची डिलीव्हरी होणार नाही. याचाच अर्थ केवळ सिलिंडर बुक करून भागणार नाही.

मोबाईल नंबर नोंदणीकृत हवा
जर एखाद्या ग्राहकाचा मोबाईल नंबर अपडेट नाही, तर डिलीव्हरी बॉयकडे अ‍ॅप असेल. डिलीव्हरी करताना त्याच्या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही तुमचा मोबाईल नंबर अपडेट करू शकता. मोबाईल नंबर अपडेट झाल्यानंतर एक कोड जनरेट होईल. मात्र जर तुमचा मोबाईल नंबर गॅस विक्रेत्याकडे अपडेट नसेल, अथवा रजिस्टर्ड नसेल तरच असे करावे लागेल. यासाठी गॅस एजन्सीमध्ये तुमचा मोबाईल नंबर आणि पत्ता योग्य द्या. ज्यामुळे तुमच्याकडे नीट डिलीव्हरी होईल.

आत्महत्या नको; फक्त एक फोन करा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,416FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या