22.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeराष्ट्रीयओटीटी प्लॅटफॉर्म : .....असा झाला पॉर्न रॅकेटचा पर्दाफाश

ओटीटी प्लॅटफॉर्म : …..असा झाला पॉर्न रॅकेटचा पर्दाफाश

एकमत ऑनलाईन

मध्य प्रदेश  : मध्य प्रदेश पोलिसांनी एका ओटीटी प्लॅटफॉर्मचा पर्दाफाश केला आहे. या ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेबसिरीजच्या नावाखाली पॉर्न व्हिडिओ प्रसारीत केले जात होते. पाकिस्तानातील नागरिकाच्या मदतीने ही सर्विस सुरु होती. मध्य प्रदेश पोलिसांनी सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या दोघांना अटक केली आहे. ग्वाल्हेर येथील ३० वर्षीय दीपक सैनी आणि मुरैना जिल्ह्याचा २७ वर्षीय केशव सिंह अशी आरोपींची नावे आहेत. लॉकडाऊनदरम्यान लोक घरी बसलेले असताना आरोपींच्या ओटीटी प्लॅटफॉर्मने मात्र कोट्यवधीची कमाई केल्याचे पोलिसांनी सांगितले.

आश्चर्यजनक बाब म्हणजे या दोन आरोपींनी पॉर्न व्हिडिओचा ओटीटी प्लॅटफॉर्म चालू करून आठ महिन्यात १.४ कोटी कमावले होते. याची माहिती मध्य प्रदेशच्या सायबर पोलिसांनी दिली आहे. इंदूरचे पोलीस अधीक्षक जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, “आम्ही या अश्लिल ओटीटी प्लॅटफॉर्मचा सर्व्हर शोधून काढला आहे. सर्व्हरवरील माहितीवरुन समजले की १ जानेवारी ते २६ ऑगस्ट दरम्यान या ओटीटी प्लॅटफॉर्मने लोकांकडून तब्बल १.४ कोटी जमवले होते.”

सध्या ओटीटीचा जमाना आहे. स्मार्टफोनवर ओटीटीचे App डाऊनलोड करुन प्रेक्षकांना हवा असलेला कंटेंट पाहता येतो. नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मला प्रसिद्धी मिळाल्यानंतर अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मनी या व्यवसायात उडी घेतली होती. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, एका खासगी कंपनीमार्फत दीपक सैनी आणि केशव सिंह अश्लिल चित्रपटांचा उद्योग चालवत होते. लॉकडाऊनदरम्यान घरी बसलेल्या लोकांमुळे त्यांचे अधिकच फावले होते. या प्लॅटफॉर्मवरील कटेंट पाहण्यासाठी ते प्रेक्षकांकडून प्रतिमहिना २४९ रुपये एवढे शुल्क घेत होते.

पोलिसांनी पुढे सांगितले की, अटक केलेले आरोपी ओटीटी प्लॅटफॉर्मवर पॉर्न चित्रपट अपलोड करायचे. तब्बल २० देशांमध्ये या प्लॅटफॉर्मचे प्रेक्षक पसरलेले आहेत. इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आरोपी ओटीटी प्लॅटफॉर्मची ब्रँडिंग करत होते. आतापर्यंत त्यांनी ८४ चित्रपट या प्लॅटफॉर्मवर रिलीज केले आहेत.

२५ जुलै रोजी इंदूर सायबर पोलिसांकडे एक तक्रार नोंदवली होती. ज्यामध्ये तिने सांगितले की, तिन लोकांनी तिच्यासोबत नावालजेल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर काम करण्यासाठी करार केला होता. त्यानंतर तिला एका फार्महाऊसवर शुटींगसाठी बोलाविण्यात आले. जिथे तिचे अश्लील व्हिडिओ बनवून ओटीटी प्लॅटफॉर्मवर टाकण्यात आले होते. त्यानंतर ते व्हिडिओ अनेक साईटवर व्हायरल झाले. यानंतर अनेक मॉडेल मुली अशाच प्रकारच्या तक्रारी घेऊन आल्या. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी मॉडेलिंग एजन्सीचा मालक मिलिंद दावर, दिग्दर्शक बिजेंद्र गुर्जर आणि कॅमेरामन अकिंत छावडा यांना १० ऑगस्ट रोजी अटक केली होती.

मुख्यमंत्री अमरिंदर सिंग : भारत-चीन युद्ध झाल्यास पाकिस्तानही सहभागी होईल

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या