29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeराष्ट्रीयकोरोना संसर्गामुळे दिल्लीत दारुण स्थिती; चक्क पार्किंगमध्ये अंत्यसंस्कार

कोरोना संसर्गामुळे दिल्लीत दारुण स्थिती; चक्क पार्किंगमध्ये अंत्यसंस्कार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोनामुळे सर्वात तीव्र फटका दिल्लीला बसल्याचे दिसून येत आहे. वाढता संसर्ग व रुग्णसेवेचा उडालेला बोजवारा यामुळे दिल्लीतील रोजच्या मृत्यूंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सध्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभुमीत जागाच उरली नसल्याचे चित्र दिसून येत आहेत. अशा परिस्थितीत कोरोना रुग्णांच्या मृतदेहांवर पार्किंगमधील जमिनीवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे.

दिल्लीतील सीमापुरी स्मशानभूमीत हे धक्कादायक चित्र पाहायला मिळाले आहे. पार्किंगमध्येच आतापर्यंत १५ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सतत मृतदेह जळत असल्याने स्मशानभूमीमधील फरशी आणि प्लेटदेखील खराब झाल्या आहेत. पूर्व दिल्लीतील ५ स्मशानभुमीपैकी सीमापुरी स्मशानात परिस्थिती सर्वात वाईट आहे.

कोविडसाठीचे १२ प्लॅटफॉर्मही कमी पडत असल्याचे चित्र आहे. याच कारणामुळे स्मशानभूमीजवळ असणा-या दिल्ली महानगरपालिकेच्या पार्किंगच्या जागेवर लोकांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. ज्योतसिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्किंगच्या आधी याठिकाणी लहान मुलांवर अंत्यसंस्कार करण्यात येत होते. मात्र पाच वर्षांपूर्वी येथे मुलांवर अंत्यसंस्कार करणे बंद करण्यात आले होते.

गोगरा, हॉट स्प्रिंग सोडणार नाही; चीनचा आडमुठपणा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या