24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीयचार राज्यांत १ लाखांवर अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

चार राज्यांत १ लाखांवर अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली. त्यामुळे दिलासा मिळत असला तरी काही राज्यांमध्ये ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या चिंताजनक स्थितीत आहे. काल देशात ६७ हजार २०८ नवीन रुग्ण आढळून आले. त्यात २३३० रुग्णांचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे देशात आताही ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ८ लाख २६ हजार ७४० आहे. एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा कमी होत असताना ४ राज्यांमध्ये कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण अधिक आहेत. या राज्यांत १ लाखांवर अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार कर्नाटकात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ५१ हजार ५६६ आहे, तर महाराष्ट्रातही १ लाख ३६ हजार ६६१ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. या व्यतिरिक्त तामिळनाडूत कोरोनाचे १ लाख १४ हजार आणि केरळमध्ये १ लाख ९ हजार ७९९ ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा आहे. या राज्यांव्यतिरिक्त असेही काही राज्य आहेत, तेथील परिस्थिती चिंताजनक बनली आहे.

कोरोनाच्या दुस-या लाटेचा सर्वाधिक परिणाम कर्नाटक, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या सारख्या राज्यांना सर्वाधिक बसला. एवढेच काय तर कर्नाटक राज्यात कोरोना व्हायरसचे रुग्ण झपाट्याने वाढले. सध्या ओडिशामध्येही कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वेगाने वाढत आहे. आंध्र प्रदेशाताही ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ४२ हजारांच्या घरात आहेत. आसाममध्ये ३८ हजारांवर अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

शाळा सोडल्याचा दाखला नसला तरी जन्म प्रमाणपत्रावर दुसऱ्या शाळेत प्रवेश

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या