कोलकाता : अप्रत्यक्षरित्या भाजपला मदत करण्यासाठी असदुद्दीन ओवैसी प्रयत्न करत असल्याची टीका काँग्रेसकडून वारंवार करण्यात येत. त्यापार्श्वभुमीवर पश्चिम बंगालमध्ये भाजपला हरवण्यासाठी आपण ममता बॅनर्जींना मदत करण्यासाठी तयार असल्याचे असदुद्दीन ओवैसी यांनी जाहीर केले आहे. एकंदरीतच ममता बॅनर्जींना ओवेसींनी आघाडीचा प्रस्ताव दिल्याचे मानले जात आहे.
बिहारच्या सीमांचल भागात पाच विधानसभा जागांवर विजय मिळवल्यानंतर एआयएमआयएच्या असदुद्दीन ओवैसी यांनी आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतही आपले उमेदवार उतरवणार असल्याचे जाहीर केले आहे.
पश्चिम बंगालमध्ये मुख्य लढत ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये असल्याचे दिसून येत आहे. परंतु, पश्चिम बंगालमधील मालदा, मुर्शिदाबाद आणि उत्तर दिनाजपूर या भागांत मुस्लिम मतदारांची संख्या अधिक आहे. या भागावर एआयएमआयएमकडून लक्ष केंद्रीत होण्याचा अंदाज आहे.
ममतांपुढील डोकेदुखी वाढणार
‘एआयएमआयएम’ची पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील स्वतंत्र एन्ट्री ही तृणमूल काँग्रेससाठीही धोक्याची ठरू शकते, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. भाजपसोबतच काँग्रेस आणि डाव्यांनाही ममता तोंड देत आहेत. त्यातच ओवैसींच्या पक्षाचा राज्यातला प्रवेश ममतांसाठी आणखी डोकेदुखी वाढवणारा ठरू शकतो.
हिमायतनगर तालुक्यातील 52 ग्रामपंचायत च्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर