36.2 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeराष्ट्रीय‘एनपीआर’वरुन ओवेसींचा इशारा

‘एनपीआर’वरुन ओवेसींचा इशारा

‘एनआरसी’च्या दिशेने पहिले पाऊल ; विरोधाचे वेळापत्रकही निश्चित करु

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : जर ‘एनपीआर’च वेळापत्रक निश्चित केले जात असेल, तर त्याला विरोध करण्याचे वेळापत्रकही लवकरच निश्चित केले जाईल.’ असा इशारा एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी दिला आहे. राष्ट्रीय लोकसंख्या सूची (एनपीआर)वरून मागेही वाद होत होता. सध्या पुन्हा एनपीआरचे वेळापत्रक निश्चित केले जात असल्याची चर्चा सुरु असून त्यापार्श्वभूमीवर ओवेसींनी हे विधान केले आहे.

ओवेसींनी या संदर्भात ट्विट केले असून, त्यामध्ये एनपीआरची लिक देखील शेअर केली आहे. तर, ‘एनपीआर एनआरसीच्या दिशेने पडलेले पहिले पाऊल आहे. भारतातील गरीबांना या प्रक्रियेत मजबूर नाही केले पाहिजे. त्यांच्याकडे ‘संशयित नागरिक’ म्हणून पाहिले गेले नाही पाहिजे. जर ‘एनपीआर’चे वेळापत्रक निश्चित केले जात असेल, तर त्याला विरोध करण्याचे वेळापत्रकही लवकरच निश्चित केले जाईल.’ असे ओवेसी यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

मोदींकडून गरीबांचे अधिकार पायदळी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या