22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeराष्ट्रीयआधी ऑक्सिजननिर्मिती, मगच जेवण

आधी ऑक्सिजननिर्मिती, मगच जेवण

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचे संकट जसे भयावह बनत चालले आहे. तसे ऑक्सिजनअभावी मृत्यूंचे प्रमाण रोज वाढत आहे. मात्र या बिकट परिस्थितीत ज्यांच्या खांद्यावर पृथ्वीचा भार असतो, असे म्हटले जाते, त्या मजूरवर्गाने कंबर कसली आहे. ओदिशातील बोकारो व भिलई येथील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांमधील मजुरांनी संपुर्ण देशाला पुरेल इतका ऑक्सिजननिर्मितीचा ध्यास घेतला असून त्यासाठी ते जेवणाकडेही दुर्लक्ष करीत आहेत.

कोरोनारुग्णांचे बंद पडणारे श्वास थांबून धरण्यासाठी देशातील सर्वच स्टील प्लान्ट समोर आले आहेत. देशाला सर्वाधिक ऑक्सिजन बोकारो सेल आणि भिलईतून मिळत आहे. बोकारो सेलमध्ये कार्यरत मजूर आणि अधिकारी दिवस-रात्र प्लान्टमध्ये काम करत आहेत. येथून रोज १५० टन ऑक्सिजनचे उत्पादन होत आहे. मध्यप्रदेशापासून उत्तरप्रदेशापर्यंत बोकारो सेलमधूनच ऑक्सिजनचा पुरवठा सुरू आहे. मजूर स्वत:कडे दुर्लक्ष करत लोकांचा जीव वाचविण्यासाठी धडपडत आहे.

जेवणासाठीही मजुरांचा नकार
बोकारो सेलमध्ये ऑक्सिजन तयार करण्यासाठी एकूण दोन प्लान्ट आहेत. या दोन्ही प्लान्टमध्ये तीन शिफ्टमध्ये काम सुरू आहे. एक शिफ्ट आठ तासांची असते. येथील कर्मचारी न थांबता ऑक्सिजन तयार करण्याचे काम करत आहेत. विशेष म्हणजे या कामगारांना जेवणाचेही भान राहत नाही. जेव्हा टिफिनची आठवण करून दिली जाते, तेव्हा हे कर्मचारी सध्या खूप काम आहे,ते पुर्ण झाल्यावर जेवणाचे बघू असे म्हणत आहेत. कोरोना रुग्णांचा जीव वाचविण्याची एक छोटीशी संधी मिळाली आहे. अशात वेळ जेवणासाठी का वाया घालवायचा? काम पूर्ण झाल्यानंतर आम्ही लोक जेवण करतो,असे मजुरांनी सांगितले.

सर्वाधिक पुरवठा उत्तर प्रदेशला
बोकारो सेलमध्ये २५ अधिकारी आणि १४५ मजूर दिवसरात्र काम करत आहेत. बोकारो सेलच्या आकडेवारीनुसार, एप्रिल महिन्यात आतापर्यंत सर्वाधिक ऑक्सिजन पुरवठा उत्तर प्रदेशला झाला आहे. उत्तर प्रदेशला ४५६ मेट्रिक टन, झारखंडला ३०८ मेट्रिक टन, बिहारला ३७४ मेट्रिक टन, पश्चिम बंगालला १९ मेट्रिक टन, पंजाबला ४४ मेट्रिक टन, महाराष्ट्राला १९ मेट्रिक टन आणि मध्यप्रदेशला १६ मेट्रिक टन ऑक्सिजन मिळाला आहे.

देशातील प्रत्येकाला मोफत लस द्या – राहुल गांधी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या