30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeराष्ट्रीयऔद्यागिक वापरासाठी ऑक्सिजन पुरवठ्यावर बंदी

औद्यागिक वापरासाठी ऑक्सिजन पुरवठ्यावर बंदी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना महारोगराईच्या दुस-या लाटेने तोंड वर काढले आहे. झपाट्याने वाढत्या रुग्णसंख्येमुळे अनेक रुग्णालयांमधील खाटा भरल्या आहेत. अनेक राज्यात वैद्यकीय ऑक्सिजनचा तुडवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने औद्योगिक उद्देशासाठीच्या ऑक्सिजनचा पुरवठा येत्या २२ एप्रिलपासून पुढील आदेशांपर्यंत प्रतिबंधित करण्याचा निर्णय घेतला आहे.

उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाने (डीपीआयआयटी) सर्व भागधारकांसोबत ही बाब विचारात घेऊन विचारविनिमय केल्यानंतर वैद्यकीय ऑक्सिजनची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी ऑक्सिजनच्या औद्योगिक वापरावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. या तात्पूरत्या निर्बंधांमुळे उपलब्ध असणारा अतिरिक्त ऑक्सिजन कोरोना रुग्णांच्या उपचारसाठी वैद्यकीय ऑक्सिजन म्हणून वापरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्राकडून ऑक्सिजन संदर्भात नव्याने काढण्यात आलेले प्रतिबंध औषधांची हवाबंद कुपी आणि कुप्या बनवणा-या उद्योगासह औषधोत्पादन, पेट्रोलियम शुद्धीकरण उद्योग, पोलाद प्रकल्प, अणु उर्जा सुविधा, ऑक्सिजन सिलिंडर उत्पादक, सांडपाणी प्रक्रिया करणारे प्रकल्प, अन्न व पाणी शुद्धीकरण तसेच भट्टी प्रक्रिया इत्यादींच्या अखंडित कार्यान्वयनाची आवश्यकता असलेले संबंधित राज्य सरकारांनी मंजुरी दिलेल्या प्रक्रिया अशा नऊ उद्योगांना लागू राहणार नसल्याचे केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

गरज असलेल्यांनाच ऑक्सिजनचा पुरवठा करावा : गोयल
केंद्र सरकारकडून महाराष्­ट्रालाच सर्वाधिक ऑक्­सिजनचा पुरवठा करण्­यात येणार आहे, असे स्­पष्­ट करत देशातील सर्वच राज्­यांनी वैद्यकीय वापरासाठीच्­या ऑक्सिजन मागणी नियंत्रणात ठेवावी. मागणी आणि पुरवठा याचे योग्­य व्­यवस्­थापन करावे, अशी सूचना आज रेल्­वेमंत्री पीयूष गोयल यांनी केली. तसेच कोरोना संसर्ग नियंत्रणात ठेवण्­याचे काम राज्­य सरकारचे असून त्­यांनी पूर्ण जबाबदारीने ते करावे, असे आवाहनही त्­यांनी केले. देशात कोरोना रुग्­णांची संख्­या वाढत राहिली तर आरोग्­य यंत्रणेच्­या मुलभूत सुविधांवर मोठा परिणाम होणार आहे. राज्­य सरकारला केंद्र सरकारचे सर्व सहकार्य आहे. आता कोरोनाच्­या प्रतिबंधासाठी सर्वच राज्­यांनी ठोस उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्­याची गरज आहे, असेही गोयल यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना लवकरच मिळणार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या