21.1 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeराष्ट्रीयपी. व्ही. सिंधूची सेमीफायनलमध्ये धडक

पी. व्ही. सिंधूची सेमीफायनलमध्ये धडक

एकमत ऑनलाईन

टोकियो : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूची कौतुकास्पद कामगिरी करत टोकियो ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीत धडक दिली आहे. तिने उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या अकाने यामागुचीवर सहज सरशी साधली. सिंधूची नव्या शैलीसमो यामागुची निष्प्रभ ठरली. तिने यामागुचीचा २१-१२, २२-२० असे सरळ सेटमध्ये नमवले.

सिंधू आता सुवर्णपदकापासून फक्त दोन पाऊल दूर आहे. उपांत्यफेरीच्या लढतीत सिंधूसमोर ताई जू यिंग किंवा रत्नाचोक इंतानोन यापैकी एकजण आमनेसामने असेल. या स्पर्धेचा चौथा उपांत्यपूर्व सामना तैवानच्या ताई जू आणि थायलंडच्या इंतानोन यांच्यात होणार आहे. हा सामना जिंकणारी खेळाडूच पी. व्ही. सिंधूला टक्कर देईल. महिला एकेरीच्या दुस-या उपांत्य फेरीत दोन चीनी खेळाडू चेन युफेई आणि ही बिंगझाओ यांच्यात सामना होईल.

आजपासून पूरग्रस्तांच्या खात्यात जमा होणार पैसे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या