29.9 C
Latur
Thursday, February 25, 2021
Home राष्ट्रीय पाक, अफगाणिस्तान आपल्यापेक्षा बर - राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर निशाणा

पाक, अफगाणिस्तान आपल्यापेक्षा बर – राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर निशाणा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष असणारे खासदार राहुल गांधी अर्थव्यवस्थेच्या सध्याच्या परिस्थितीबरोबरच सतत घसरण होत असणा-या जीडीपीवरुन सरकारवर सतत निशाणा साधताना दिसत आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) आकडेवारीनुसार २०२० च्या आर्थिक वर्षात बांगलादेशच्या जीडीपीमध्ये चार टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बांगलादेश लवकरच भारताला सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट अर्थात जीडीपी) बाबतीत पिछाडीवर टाकणार आहे, असा अंदाज आयएमएफच्या ताज्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. या अहवालामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेसंदर्भातील चिंता आणखीन वाढली आहे. याचवरुन राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

राहुल यांनी शुक्रवारी केलेल्या ट्विटमध्ये भारताच्या तुलनेत पाकिस्तान आणि अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था स्थिर असल्याचे म्हणत सरकारला टोला लगावला आहे.

कोरोना हाताळण्यात इतर देश बरे
भाजपा सरकारची आणखीन एक जबदस्त कामगिरी. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने आपल्यापेक्षा अधिक चांगल्याप्रकारे कोरोना परिस्थिती हाताळली आहे, असे राहुल यांनी ट्विट केले आहे.

दोन दिवसांत शिवणी बॅरेजचे दरवाजे पूर्ववत दुरुस्त; क्षमतेच्या ३० टक्क्यांपर्यंत पाणी जमा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,432FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या