28 C
Latur
Sunday, January 17, 2021
Home राष्ट्रीय पाकमध्ये दहशतवाद्यांना मिळते फाइव्ह स्टार सेवा - यूनोत भारताने केली पाकची पोलखोल

पाकमध्ये दहशतवाद्यांना मिळते फाइव्ह स्टार सेवा – यूनोत भारताने केली पाकची पोलखोल

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या मुद्द्यावरून संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील एका खुल्या चर्चेत परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले. एवढेच नव्हे तर चीनचे नाव न घेता जयशंकर यांनी दहशतवाद्यांविरूद्धच्या जागतिक कारवाईत अडथळे निर्माण करण्याच्या आपल्या प्रयत्नांचा जयशंकर यांनी निषेध केला. तसेच, यातून संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या दिलेल्या अधिकारांचा गैरवापर होत असल्याचेही जयशंकर यांनी सुनावले.

दहशतवादाचा सामना करण्यासाठी आणि प्रभावी कारवाईची खात्री करण्यासाठी आठ-कलमी कृती आराखड्याचा प्रस्तावही जयशंकर यांनी दिला. दहशतवादाविरोधातील लढाईत आंतरराष्ट्रीय सहकार्य या खुल्या चर्चेत भाग घेतला. १ जानेवारी २०२१ ला भारताने यूएनएससीचे सदस्यत्व स्वीकारल्यानंतर परराष्ट्रमंत्र्यांनी हस्तक्षेप करण्याची ही पहिली वेळ होती. जगाने दहशतवादाविरूद्ध झिरो टॉलेरन्स दाखवण्याची वेळ आता आली आहे. पाकिस्तानचे नाव न घेता परराष्ट्रमंत्र्यांनी मंचाला भारत अनेक दशकांपासून दहशतवादाविरुद्ध कसा लढा देतोय, याची माहिती दिली.

दहशतवादाविरूद्धच्या लढाईत दुहेरी निकषांना कुठलेही स्थान नाही. दहशतवादी हे दहशतवादी असतात. चांगले आणि वाईट यात फरक असू शकत नाही. जे लोक असा भेद करतात त्यांचा अजेंडा असतो. ते दहशतवाद्यांच्या कारवाया लपवतात. यामुळे तेही दहशतवाद्यांइतकेच दोषी आहेत, असे जयशंकर म्हणाले.

पाकिस्तानवर निशाणा साधला
दहशतवाद आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर संघटीत गुन्हेगारी ओळखणे आवश्यक आहे आणि कठोरपणे कारवाई करणे गरजेचे आहे. १९९३ च्या मुंबई बॉम्ब स्फोटांसाठी जबाबदार गुन्हेगारांना फाइव्ह स्टार पाहुणचार मिळाल्याचे आम्ही बघितले आहे, असे म्हणत जयशंकर यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवरून पाकिस्तानचा उल्लेख न करता लक्ष्य केले़

भारत आणि नेपाळ चांगले मित्र – ओलींचा यू-टर्न

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या