24.3 C
Latur
Thursday, June 24, 2021
Homeराष्ट्रीयपाककडून भारताला शांततेचा प्रस्ताव - काश्मिरातील सैन्य मागे घेण्याची अट

पाककडून भारताला शांततेचा प्रस्ताव – काश्मिरातील सैन्य मागे घेण्याची अट

एकमत ऑनलाईन

इस्लामाबाद : पाकिस्तानमधील राजकीय संकटात अडकलेल्या पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला शांततेचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, शांतता प्रस्तावात इम्रान खान यांनी काश्मीरचा राग आळवला आहे. पाकिस्तानची भारतासोबत शांततेसाठी चर्चा करण्याची तयारी आहे. मात्र, काश्मीरमधील सैन्य मागे घेऊन सार्वमत घेण्याची अट इम्रान खान यांनी ठेवली आहे.

इम्रान खान यांनी सांगितले की, आम्ही शांततेसाठी तयार आहोत. मात्र, भारताने काश्मीर आपले सैन्य मागे घ्यायला हवे. त्याशिवाय संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावानुसार काश्मिरी नागरिकांना स्वयंनिर्णय घेण्याचा अधिकार दिला जावा, अशी मागणी इम्रान खान यांनी केली आहे. भारतीय उपखंडात शांतता आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

इम्रान खान यांनी म्हटले की, २०१८ मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भारताला शांततेचा प्रस्ताव दिला होता. त्याशिवाय भारताने शांततेसाठी एक पाऊल उचलले की, पाकिस्तान दोन पावले उचलेल असेही त्यावेळी म्हटले होते. भारत सरकारने शांततेकडे वळण्याऐवजी काश्मीर हडपला असल्याचा हास्यास्पद आरोप इम्रान खान यांनी केला. भारताने काश्मीरमध्ये सैन्याची संख्या वाढवली असल्याचाही आरोप त्यांनी केला.

पाक नकाशातून पीओके, गिलगिट-बाल्टिस्तान वगळले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या