24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीयगुजरातमध्ये २०० कोटींच्या ड्रग्जसह पाकिस्तानी बोट जप्त

गुजरातमध्ये २०० कोटींच्या ड्रग्जसह पाकिस्तानी बोट जप्त

एकमत ऑनलाईन

जाखू : भारतीय तटरक्षक दल(आयसीजी) आणि गुजरात एटीएसने भारतीय हद्दीत घुसलेली पाकिस्ताची बोट जप्त केली आहे. या कारवाईमध्ये २०० कोटी रुपयांचे ४० किलो ड्रग्ज जप्त केल्याचेही सांगितले जात आहे. पुढील तपास व कारवाईसाठी बोट व बोटीचे पाकिस्तानी चालक यांना जाखू येथे आणण्यात आले आहे.

मागील काही महिन्यापासून गुजरात एटीएसकडून अंमली पदार्थ विरोधी कारवाई सुरू आहे. याच कारवाईमध्ये काही महिन्यांपूर्वी केलेल्या कारवाईत अंमली पदार्थाचा साठा जप्त केला होता. काही दिवसांपूर्वी गुजरात एटीएस आणि डीआरआयने कोलकाता येथे केलेल्या कारावाईत तब्बल २०० कोटीचे ड्रग्ज जप्त केले आहे. स्क्रॅप बॉक्समध्ये ४० किलो ड्रग्ज दुबई येथून भारतात आणले जात असल्याची माहिती समोर आली आहे.

सुरक्षा दलाची संयुक्त मोहीम
कोलकाता येथे करण्यात आलेल्या कारवाईत गुजरात पोलिस तटरक्षक बल, एनसीबी, पंजाब, दिल्ली पोलिस आणि अन्य एजन्सीने संयुक्त मोहीम राबवत ही कारवाई केली होती. या कारवाईमध्ये १२ गिअर बॉक्समध्ये लपवण्यात आलेले २०० कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. हे ड्रग्ज दुबईच्या जेबेल अली पोर्ट येथून शिपिंग कंटेनरमध्ये पाठवण्यात आले होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या