24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeराष्ट्रीयनुपूर शर्मांच्या हत्येसाठी आलेल्या पाकिस्तानी घुसखोरास अटक

नुपूर शर्मांच्या हत्येसाठी आलेल्या पाकिस्तानी घुसखोरास अटक

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : बीएसएफने पाकिस्तानच्या सीमेवरून एका घुसखोराला ताब्यात घेतले आहे. भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांची हत्या करण्यासाठी हा संशयित पाकिस्तानातून भारतात आला होता असा दावा अधिका-यांकडून करण्यात आला आहे. बीएसएफने या संशयिताला राजस्थामधील श्रीगंगानगर येथून ताब्यात घेतले आहे. रिझवान अश्रफ असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव असून त्याची सध्या कसून चौकशी करण्यात येत आहे.

बीएसएफने ताब्यात घेतलेला रिझवान हा पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील मंडी बहाव बीन येथील रहिवाशी असल्याची माहिती समोर आली आहे. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिझवान याने एका मौलवीसोबत बैठक घेतली होती आणि यामध्ये नुपूर शर्मा यांची हत्या करण्यासाठी भारतात घुसखोरी करण्याचे नियोजन झाले होते. हिंदुमलकोट चेकपोस्टच्या खंखा चेकपोस्टवर भारतीय हद्दीत घुसण्याच्या तयारीत असताना बीएसएफने त्याला ताब्यात घेतले. सध्या पाच एजन्सी रिझवान याची चौकशी करत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या