24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeमहाराष्ट्रपंकजा मुंडे दिल्लीत दाखल

पंकजा मुंडे दिल्लीत दाखल

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आल्यामुळे मुंडे समर्थकांनी राजीनामा अस्त्र बाहेर काढले आहे. बीड आणि अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भाजप कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. या सर्व घटना घडत असतानाच रविवार दि़ ११ जुलै रोजी पंकजा मुंडे या दिल्लीमध्ये दाखल झाल्या.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत पंकजा मुंडे यांची महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीनंतर मंगळवारी पंकजा मुंडे मुंबईत कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. पंकजा मुंडे यांच्या दिल्ली दौ-यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. याबैठकीत मोठा निर्णय होऊ शकतो, असा राजकीय विश्लेषकांनी अंदाज व्यक्त केला आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आल्याचे तीव्र पडसाद आता उमटू लागले आहेत. भाजपमधील मुंडे समर्थकांनी राजीनामे द्यायला सुरुवात केली आहे. भाजपचे बीड जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर (ता. १० जुलै) बीडमधील १४ पदाधिका-यांनी राजीनामे दिले असून, त्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा समावेश आहे. विस्ताराच्या दिवशीही मुंडे समर्थकांकडून सोशल मीडियातून तीव्र प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या दिल्ली दौ-याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

राष्ट्रीय सचिवांची होणार बैठक
राजधानी दिल्लीमध्ये भाजपच्या राष्ट्रीय सचिवांची बैठक पार पडणार आहेत. या बैठकीत पंकजा मुंडे सहभागी होणार आहेत. यावेळी पंकजा मुंडे भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेणार आहेत. दरम्यान यावेळी पंकजा मुंडे समर्थकांची नाराजी पक्षश्रेष्ठींसमोर मांडणार का? हे पहावं औत्सुक्याचे ठरणार आहे.

पावसाचे पुनरागमन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या