27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयपापा आप हर पल साथ, मेरे दिल में हैं

पापा आप हर पल साथ, मेरे दिल में हैं

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर लिहिले की, पापा, आप हर पल मेरे साथ, मेरे दिल में हैं. मैं हमेशा प्रयास करूंगा की देश के लिए जो सपना आपने देखा, उसे पूरा कर सकूं. यासोबतच त्यांनी एक भावनिक व्हीडीओही शेअर केला आहे.

भारताचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव गांधी यांची आज ७८ वी जयंती आहे. या निमित्याने काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी त्यांच्या वीरभूमी स्मृतीस्थळावर त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी रॉबर्ट वाड्रा यांच्याशिवाय काँग्रेस पक्षाचे नेते मल्लिकार्जुन खर्गे, केसी वेणुगोपाल आणि इतर नेतेही उपस्थित होते.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना आपल्या वडिलांची आठवण झाली. त्यांच्या वडिलांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी त्यांची आठवण करून त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त राहुल गांधींनी त्यांच्या वडिलांची खास आठवण करून देणारा एक भावनिक व्हीडीओ ट्विटरवर शेअर केला आणि लिहिले की, बाबा, तुम्ही क्षणोक्षणी माझ्या सोबत माझ्या काळजात आहात. देशासाठी तुम्ही पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा मी सदैव प्रयत्न करेन असे म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या