21.1 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeराष्ट्रीयसंसदेत ट्रॅक्टर प्रकरणी राहुल गांधींविरोधात गुन्हे दाखल

संसदेत ट्रॅक्टर प्रकरणी राहुल गांधींविरोधात गुन्हे दाखल

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल संसदेत ट्रॅक्टर रॅली काढली होती. त्यावरुन आता दिल्ली पोलिसांनी त्यांच्याविरोधात खटला दाखल केला आहे. संसद मार्ग पोलिस स्टेशनमध्ये राहुल गांधींसहकाँग्रेस नेत्यांवर भा.दं.वि. कलम १८८ आणि महामारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल गांधी ट्रॅक्टर घेऊन संसदेपर्यंत कसे आले, याचाही तपास दिल्ली पोलिस करत आहे.

पावसाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे संसद परिसरात कलम १४४ लागू आहे. अशा परिस्थितीत ट्रॅक्टर परिसरात कसा आला, हा प्रश्न विचारत भाजप नेत्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे़ आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे, काँग्रेसने रविवारी रात्रीच एका कंटेनरमधून ट्रॅक्टर लुटियन झोन परिसरात आणला होता. सध्या दिल्ली पोलिसांनी हा ट्रॅक्टर जप्त केला असून, अधिक तपास सुरू आहे.

आंदोलनाची परवानगी नव्हती
दिल्ली पोलिसांनी सांगितल्यानुसार, काँग्रेसकडून या ट्रॅक्टर रॅलीसाठी कुठलीही परवानगी घेण्यात आली नव्हती. तसेच, या ट्रॅक्टरच्या पुढे-मागे नंबर प्लेटही नव्हती. सध्या या ट्रॅक्टरच्या मालकाचा शोध सुरू आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितल्यानुसार, नवी दिल्लीमध्ये ट्रॅक्टर चालवण्यास बंदी आहे. त्यामुळे काँग्रेसने जाहिररित्या मोटार अ‍ॅक्टचे उल्लंघन केले आहे.

काँग्रेस संसदेचे कामकाज सुरळीत होऊ देत नाही

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या